भीषण! ज्या रुग्णवाहिकेतून भावंडांना जीव वाचवायचा होता..तिचाच झाला चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

पाचोरा येथील बागवान कुटुंबीयांतील रुग्णाला घेऊन ही रुग्णवाहिका (एमएच 03, 4677) नाशिककडे येत होती. सोमवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव बसवंतजवळील शिरवाडे फाटा येथील हॉटेल गोदावरीसमोरून रुग्णवाहिका जात होती. त्यावेळीच अचानक...

नाशिक / पिंपळगाव बसवंत : पाचोरा येथील बागवान कुटुंबीयांतील रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका नाशिककडे येत होती. सोमवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव बसवंतजवळील शिरवाडे फाटा येथील हॉटेल गोदावरीसमोरून रुग्णवाहिका जात होती. त्यावेळीच अचानक...

अशी घडली धक्कादायक घटना

पाचोरा येथील बागवान कुटुंबीयांतील रुग्णाला घेऊन ही रुग्णवाहिका (एमएच 03, 4677) नाशिककडे येत होती. सोमवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव बसवंतजवळील शिरवाडे फाटा येथील हॉटेल गोदावरीसमोरून रुग्णवाहिका जात होती. त्या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्‍टरने (एमएच 41, जी 4589) रुग्णवाहिकेस जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की यात रुग्णवाहिकेचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यातील अजिजाबी मोईद्दिन बागवान (वय 60), रफिउद्दिन मोईद्दिन बागवान (55) व कमरूबी मोईद्दिन बागवान (60, सर्व रा. उपनगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक सागर भिकन पाटील गंभीर जखमी आहे.

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! लॉकडाऊनमध्ये माऊलीच्या नशिबाची दैना..वंशाचे दोन-दोन दिवे असूनही तिचे जीवन रस्त्यावरच!

तिघा भावंडांचा मृत्यू..शिरवाडे फाटा परिसरात ट्रॅक्‍टरची धडक

पाचोरा (जि. जळगाव) येथून रुग्ण घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिकेला मुंबई-आग्रा महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्‍टरने जोरदार धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील तीन भावंडं जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये दोन बहिणी व एका भावाचा समावेश आहे. शिरवाडे फाट्यालगत रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In an ambulance accident The death of three siblings nashik marathi news