VIDEO : "गणित शिकवायला हीच शिक्षिका हवी." ट्रिक बघून व्हाल हैराण! व्हिडिओ तुफान व्हायरल..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

ट्विटरवर हा व्हिडिओ अपलोड करताना आनंद महिंद्राने यांनी तर, ‘काय? मला या शॉर्टकटबद्दल अजिबात माहिती नव्हती. माझी इच्छा आहे की ही माझी गणिताची शिक्षिका असावी. असे झाले असते तर मी गणितात नेहमी चांगले मार्क्स मिळवले असते’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. . हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या शिक्षिकेचे कौतुक वाटेल. 

नाशिक :  विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा कठीण वाटतो. अशावेळी शिक्षकांकडून विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कारण विद्यार्थ्यांना जर शाळेत प्रश्न विचारला की, तुम्हाला कोणत्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तर विद्यार्थी गणिताचा विषय अवघड जात असल्याचेच सांगतात. मुलांना गणित सोप्पं वाटावं तसेच गोडी निर्माण व्हावी यासाठी  एका शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

शिक्षिकेची मजेशीर ट्रिक!
ही शिक्षिका अगदी सोप्या पध्दतीने मुलांना  ९ चा पाढा शिकवित आहे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटावर मुलांना त्या ९चा पाढा शिकवित आहे. या व्हिडिओमध्ये, शिक्षिकेने एका मुलीला उभे केले आणि हाताचा कॅल्क्युलेटर वापरून गुणाकार केला. असा गुणाकार तुम्ही कधीच पाहिला नसेल. 

शाहरुख खान अन् आनंद महिंद्राही प्रभावित..केले ट्विट..
ट्वीटरवर हा व्हिडिओ अपलोड करताना आनंद महिंद्राने यांनी तर, ‘काय? मला या शॉर्टकटबद्दल अजिबात माहिती नव्हती. माझी इच्छा आहे की ही माझी गणिताची शिक्षिका असावी. असे झाले असते तर मी गणितात नेहमी चांगले मार्क्स मिळवले असते’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. . हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या शिक्षिकेचे कौतुक वाटेल. 

 

या शिक्षकांच्या शैलीने शाहरुख खान देखील खूप प्रभावित झाला आहे. त्यांनी हा व्हिडिओ रीट्वीट करत लिहिले की, या साध्या कल्पनेने माझ्या आयुष्यातील किती गणितांच्या समस्या सुटल्या आहेत’.हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत आठ हजार लोकांनी रीट्वीट केला आहे आणि अनेक लोकांनी लाईक केला आहे.

पाया मजबूत व्हावा - गणित शिक्षक
गणित विषय शिकविताना विविध शैक्षणिक साधनांचा वापर करणारे शिक्षकही आहेत. विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा आकृतींमुळे कठीण वाटतो. अशावेळी या आकृत्यांसाठी विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. तसेच विद्यार्थ्यांना हे सहज समजत असल्याची पुष्टीही होत आहे. गणितासारखा कठीण विषय सोपा करण्यासाठी या विषयाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पाढे, समीकरणे, वर्ग यासारखे पाठांतर करून घेणे महत्त्वाचे आहे, यावर गणिताचे अनेक शिक्षक भर देतात. अपूर्णाकांची बेरीज, वजाबाकी यांसारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही शिक्षक व्यक्त करतात.

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher,s maths new trick video viral on social media Nashik Marathi News