esakal | आश्चर्यकारक! महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ चक्क सांडपाण्यात लोळुन आंदोलन..संतप्त आंदोलनकर्त्यांचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon andolan 1.jpg

अनेक ठिकाणी नाले सफाई न झाल्याने गटारींचे सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. संजरी नगरात श्रमदान व वर्गणीतून केलेला छोटा पूल वाहून गेला. पुर्व भागातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली गेले. आज सकाळी जुन्या महामार्गाची पहाणी करण्यासाठी अधिकारी येणार होते. सकाळी अकरापर्यंत प्रतिक्षा करुनही अधिकारी, कर्मचारी आलेच नाही

आश्चर्यकारक! महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ चक्क सांडपाण्यात लोळुन आंदोलन..संतप्त आंदोलनकर्त्यांचा आक्रोश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : शहरात अनेक ठिकाणी नाले सफाई न झाल्याने गटारींचे सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. संजरी नगरात श्रमदान व वर्गणीतून केलेला छोटा पूल वाहून गेला. पुर्व भागातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली गेले. आज सकाळी जुन्या महामार्गाची पहाणी करण्यासाठी अधिकारी येणार होते. सकाळी अकरापर्यंत प्रतिक्षा करुनही अधिकारी, कर्मचारी आलेच नाही..अखेर नागरिकांचा संताप झाला आणि केले असे..

चक्क सांडपाण्यात लोळुन आंदोलन

शहरात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते लॉकडाऊन झाले. प्रमुख रस्ता असलेल्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर जाफरनगर ते देवीचा मळा या भागात खड्ड्यांचे साम्राज्य, सांडपाणी साचल्याने व विभागातील काही भागात पाणी घुसल्याने महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांनी चक्क सांडपाण्यात लोळुन आंदोलन केले.

अधिकारी, कर्मचारी न आल्याने आंदोलन करावे लागले

महामार्गावरील सांडपाणी, खड्डे या संदर्भात दोन दिवसापुर्वी प्रशासनाला माहिती दिली होती. अनेक ठिकाणी नाले सफाई न झाल्याने गटारींचे सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. संजरी नगरात श्रमदान व वर्गणीतून केलेला छोटा पूल वाहून गेला. पुर्व भागातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली गेले. आज सकाळी जुन्या महामार्गाची पहाणी करण्यासाठी अधिकारी येणार होते. सकाळी अकरापर्यंत प्रतिक्षा करुनही अधिकारी, कर्मचारी न आल्याने आंदोलन करावे लागल्याचे रिजवान बॅटरीवाला यांनी सांगितले.  

हेही पाहा> VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

वारंवार सांगुनही प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष

महामार्गावरील सांडपाण्यातील खड्ड्यात खुर्ची ठेवून वाहनांना मार्ग दाखवित अपनी जान बचाव अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. चारशे कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक असलेली महापालिका शहरातील एक प्रमुख महामार्ग सुरळीत ठेवू शकत नाही. महापालिका प्रशासनाचा धिक्कार करतो. वारंवार सांगुनही प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करते असे श्री. बॅटरीवाला यांनी या वेळी सांगितले. आंदोलनात नवीद अख्तर, रिजवान अहमद, मोहंमद फैजान, यासर अराफत आदींसह जाफरनगर भागातील काही युवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अखेर आंदोलनकर्त्यांनी मागे घेतले आंदोलन

आवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला व सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 2) दुपारी जुन्या महामार्गावरील अन्सार पत्रा डेपोसमोर गटार व सांडपाण्यात लोळून अनोखे आंदोलन केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, आयेशानगरचे पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील व सहकाऱ्यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन जेसीबी व सक्‍शन पंपच्या मदतीने सांडपाणी व गाळ हटविल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

हेही वाचा > "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर

go to top