esakal | "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

wari 1.jpg

 नाशिकमध्ये एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा समोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारीही यंदा रद्द करावी लागली. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांनी काल (ता.३०) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीनं न जाता या पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात आल्या. पण, यातही एसटी महामंडळाचा एक लाजीरवाणा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

"बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा समोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारीही यंदा रद्द करावी लागली. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांनी काल (ता.३०) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीनं न जाता या पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात आल्या. पण, यातही एसटी महामंडळाचा एक लाजीरवाणा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

एसटी महामंडळाचा एक लाजीरवाणा प्रकार चव्हाट्यावर

त्र्यंबकेश्वरहून या पादुकांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, ध्वजकरी, टाळकरी आणि व्यवस्थापकांसह केवळ 20 जणांनाचं परवानगी देण्यात आली हाती. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे शिवशाही बस पंढरपूरला रवाना झाली. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन ही बस पंढरपुरात दाखल झाली. परंतु, शरमेची बाब म्हणजे, महामंडळाने चक्क निवृत्तीनाथ महाराजांचेच  तिकीट फाडले असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

...म्हणून अनावधानाने त्यांनी धनादेश स्वीकारला

त्रंबकेश्वरहुन पंढरपुरला रवाना झालेल्या शिवशाहीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. संबंधित आगार व्यवस्थापकाला याबाबत माहिती नव्हती म्हणून अनावधानाने त्यांनी धनादेश स्वीकारला. परंतु सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत सादर केलेला नसून संबंधित संस्थेला परत करणार आहोत.- नितीन मैंद, विभाग नियंत्रक, नाशिक.

20 वारकऱ्यांसाठी तब्बल 71 हजार रुपये

एकूण 20 वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने तब्बल 71 हजार रुपये आकारले. फक्त 48 तासांच्या या प्रवासासाठी ही रक्कम आकारण्यात आली आहे.  त्यामुळे वारकऱ्यांनी वर्गणी गोळा करून 71 हजार महामंडळाकडे भरले. त्यानंतरच शिवशाही बसने वारकऱ्यांना पंढरपूरला पोहोचता आले. त्र्यंबकेश्वरमधून दरवर्षी नित्याप्रमाणे  50 ते 60 हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरला जात असतात. या काळात त्यांना कोणताही खर्च लागत नाही. परंतु, यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना अटीशर्थींसह पंढरपूरला पायी न जाता शिवशाही बसने पोहोचावे लागले. पण, त्यासाठीही मंडळाकडून 71 हजार खर्च घेतला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

go to top