"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

संचारबंदी सुरु असतांना काही तरुन विनाकारण रस्त्यावर येत आहे. किंवा दुचाकीवरून फेरफटका मारण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांना वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी यांनी शहरातील ग्रस्ती दरम्यान व पोलिस ठाणे, कॉलेज प्रवेशद्वारा समोर व कळवण चौफुली दरम्यान नाकाबंदी करीत लाठीचा प्रसाद दिला जात आहे. तसेच 'मी घरात राहू शकत नाही, कारण मी समाजाचा शत्रू आहे'  असा मजकूर असलेला फलक संचारबंदीचा भंग करणाऱ्या तरुणांच्या हातात धरावयास लावून अशांचे छायाचित्र काढण्यात आले आहे.

नाशिक / वणी : संचारबंदी असतांनाही विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना वणी पोलिसांच्या वतीने मोफत मसाज करण्यात येत असून घरात बसून कंटाळला असेल तर पोलिस चेक पाईंटवर येवून मसाजाचा लाभ घेण्याचे आवाहन सोशल मिडीयातून पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

'मी घरात राहू शकत नाही, कारण मी समाजाचा शत्रू आहे'  

संचारबंदी सुरु असतांना काही तरुन विनाकारण रस्त्यावर येत आहे. किंवा दुचाकीवरून फेरफटका मारण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांना वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी यांनी शहरातील ग्रस्ती दरम्यान व पोलिस ठाणे, कॉलेज प्रवेशद्वारा समोर व कळवण चौफुली दरम्यान नाकाबंदी करीत लाठीचा प्रसाद दिला जात आहे. तसेच 'मी घरात राहू शकत नाही, कारण मी समाजाचा शत्रू आहे'  असा मजकूर असलेला फलक संचारबंदीचा भंग करणाऱ्या तरुणांच्या हातात धरावयास लावून अशांचे छायाचित्र काढण्यात आले आहे. तसेच घरात बसून अंग दुखत व कंटाळा आला असेल तर थोडावेळ कळवण चौफुली किंवा ग्रामपंचायत वणी कार्यालया जवळ किंवा पोलिस ठाणे समोर फिरायला या..!! पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा सुरू आहे.. सेवेचा लाभ घ्या..!!
नाही तर घरी आराम करा व टीवी पाहण्याच्या आनंद घ्या..!!

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी यांनी व्हाटसॅपद्वारे दिला संदेश

विना कारण बाहेर जाऊ नका. अशा आशयाचा सुचना संदेश सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी यांनी व्हाटसॅपद्वारे दिला आहे. त्यांच्या या संदेशाची अंमलबजावणी दुपारनंतर चांगल्या प्रकारे झाल्याने सकाळपासून बऱ्यापैकी गर्दी असलेल्या पोलिसांचे मसाज केंद्रावर दुपार नंतर तरुणांची तुरळक हजेरी लागत होती.

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal from police on social media due to ban in state Nashik Marathi News