#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, तहसिलदार, आरोग्य विभाग, पोलिस विभाग किंवा इतर शासकीय विभागाकडून जे मेसेज अथवा आदेश येतात ते त्यांच्या शासकीय ग्रुपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविले जातात. काही सूचना परिपत्रक जनतेपर्यंत पोहचवायचा असेल. तर ते शासकीय संकेतस्थळावरून प्रसिद्ध करतात किंवा त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सपग्रुपवरून संबंधित मेसेज दिला जातो. पुढे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आदी शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचविला जातो. तसेच शासन प्रमाणित वृत्तपत्र व त्यांच्या डिजीटल संकेतस्थळावरून आलेल्या मेसेजवरच जनतेने विश्वास ठेवावा, असा संकेत आहे. 

नाशिक : जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने जिल्हाधिकार्‍यांनी आवाहन केल्याचा मेसेज सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये फॉरवर्ड केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल झाली असून असे मेसेज फॉरवर्ड करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच असे केल्यास संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहेत. याबाबत दक्षता घ्यावी आणि शहानिशा न करता कोणतेही मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहनही जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

...अशा मेसेजवरच जनतेने विश्वास ठेवावा.

जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, तहसिलदार, आरोग्य विभाग, पोलिस विभाग किंवा इतर शासकीय विभागाकडून जे मेसेज अथवा आदेश येतात ते त्यांच्या शासकीय ग्रुपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविले जातात. काही सूचना परिपत्रक जनतेपर्यंत पोहचवायचा असेल. तर ते शासकीय संकेतस्थळावरून प्रसिद्ध करतात किंवा त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सपग्रुपवरून संबंधित मेसेज दिला जातो. पुढे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आदी शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचविला जातो. तसेच शासन प्रमाणित वृत्तपत्र व त्यांच्या डिजीटल संकेतस्थळावरून आलेल्या मेसेजवरच जनतेने विश्वास ठेवावा, असा संकेत आहे. 

नागरीकाने सहकार्य करणे गरजेचे
सध्या कोरोना व्हायरसची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरीकांना सहकार्य करण्याची विनंती करत आहे. आज देशावरच नाही तर संपूर्ण जगावर मोठे संकट आलेले आहे. आलेले संकट लवकरात लवकर टळावे यासाठी प्रत्येक नागरीकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याचा उल्लेख करत (फेक मेसेज) फॉरवर्ड करून खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न सोशल मिडीयात होऊ पाहत आहे. अशा प्रकारचा मेसेज सध्या महाराष्ट्राच्या जिल्हया-जिल्ह्यात व्हायरल होत असून त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल होत आहे. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

सतर्कतेचे आवाहन

संपुर्ण जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशातील परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे दिल्ली ते गल्लीपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन विविध उपाययोजना राबवित असताना जनतेला सतर्कतेचे आवाहनही करत आहे. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File a complaint with the cyber cell on Fake messages in the name of collectors go viral nashik marathi news