esakal | शेतकऱ्यांनो! कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा घ्या फायदा; ऑनलाइन अर्ज शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

farmer.png

राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना नव्याने सुरू केली असून, बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले. 

शेतकऱ्यांनो! कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा घ्या फायदा; ऑनलाइन अर्ज शक्य

sakal_logo
By
अंबादास देवरे

नाशिक : (सटाणा) राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना नव्याने सुरू केली असून, बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले. 

या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा

ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र तसेच पॉवर टिलर, वीडर, रिपर कापणी यंत्र, खरेदी करायचे असतील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर आर. सी. बुक, जातीचा दाखला या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करावी. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

यापूर्वी योजनेसाठी केलेले सर्व अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन अर्ज करावेत. लाभार्थी निवड लकी ड्रॉ- सोडत पद्धतीने होणार आहेत. गावातील सी. एस. सी. सेंटरवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावेत, असेही सौ. चव्हाण यांनी सांगितले.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ