सकाळ इम्पॅक्ट : बत्ती गुल मुंबईला, पण संच पेटणार नाशिकला! औष्णिक केंद्रातील संच सुरू करण्यास मान्यता

नीलेश छाजेड 
Wednesday, 14 October 2020

सोमवारी सकाळी दहाला ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली. ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिकचे संच सुरू असणे गरजेचे आहे, असे वीजनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

नाशिक/एकलहरे : पडघा केंद्रातील विजेचा भार वाढल्याने ग्रीड फेल्युअर होऊन सोमवारी (ता.१२) सकाळी मुंबईतील बत्ती गुल झाली होती. जर नाशिक औष्णिक वीज केंद्राचा एक जरी संच सुरू असता, तर सोमवारी ग्रीड फेल होण्याची वेळ आली नसती, याविषयी ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत अखेर प्रशासनाने नाशिकचा एक संच सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. बुधवारी (ता.१४) सायंकाळी येथील टप्पा दोनमधील एक संच सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. 

सोमवारी सकाळी दहाला ग्रीड फेल झाले व संपूर्ण मुंबई विजेला मुकली. ग्रीड स्टेबिलिटीसाठी नाशिकचे संच सुरू असणे गरजेचे आहे, असे वीजनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून राज्यातील उद्योगधंदे बंद असल्याने विजेच्या मागणीत मोठी घटल्याचे कारण देत नाशिक वीज केंद्रातील निर्मिती तब्बल सात महिने शून्यावर होती. टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठत गेला व राज्याची विजेची मागणीही वाढत गेली. इतर वीज केंद्रे सुरू झाली; पण अद्याप नाशिकला संच सुरू करण्यास परवानगी मिळालेली नव्हती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एक संच तातडीने सुरू करण्याच्या सूचना लोड डीसपॅच सेंटर, कळवा येथून देण्यात आल्या. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

...तर व्होल्टेज ड्रॉप नसते 
सोमवारी सकाळी एसएलडीसी, कळवावरून मुंबईला जाणारे तीन फीडर ‘फेल’ झाले व त्याचा भार (लोड) पडघा लाइनवर आला व त्याचा परिणाम बाभळेश्वर लाइनवर होऊन ग्रीड फेल झाले होते. जर त्यादरम्यान नाशिकचा एखादा जरी संच जरी सुरू असता, तर व्होल्टेज ड्रॉप झाले नसते आणि मुंबई शहरावर वीज जाण्याचे संकट ओढवले नसते. विजेची मागणी जेमतेम १५ हजार मेगावॉट असताना ग्रीड फेल झाले होते. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval to start a set of thermal power plant nashik marathi news