आश्चर्यच! विनाचर्चा 22 कोटीच्या पुलांना मंजुरी...तरीही विरोधकांची मात्र चुप्पी? 

nmc nashik.jpg
nmc nashik.jpg
Updated on

नाशिक : कोव्हीड 19 मुळे महापालिकेची परिस्थिती डबघाईला आली असताना कामांचा प्राधान्यक्रम ठरवून करोडो रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणे अपेक्षित असतांना स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी पहिल्याच सभेत प्रत्येकी अठरा व चार कोटी रुपयांच्या दोन पुलांना विनाचर्चा मंजुरी देऊन स्वत:भोवती संशय निर्माण केला आहे.

निधी बचतीपेक्षा खर्चाकडेचं लक्ष

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने कामे ठरविण्याची विनंती देखील सभापतींनी फेटाळून लावली. सन 2019 मध्ये गोदावरी नदीवर सुमारे 32 कोटी रुपयांचे दोन पुल बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील एका पुलाच्या कामाला यापुर्वींच मंजुरी देण्यात आली तर स्थायी समितीवर आज जेहान सर्कलपासून गोदावरी नदीकडे जाणाऱ्या 17 कोटी 94 लाख रुपयांच्या पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. तर सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 26 मधील सुलावाईन चौक ते दत्त मंदीराकडे जाणाऱ्या 3 कोटी 79 लाख रुपयांच्या आणखी एका पुलाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे या पुलांवरून गेल्या वर्षभरापासून वाद निर्माण झाला त्यात कोव्हीड 19 मुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून अधिकाधिक निधी वाचविणे अपेक्षित असताना आर्थिक तंगीच्या काळात 22 कोटी रुपये पुलाच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही पुल भविष्यातील सोय म्हणून तयार करायचे असताना देखील निधी बचतीपेक्षा खर्चाकडेचं लक्ष पुरविण्यात आले. 

विरोधकांनीही साधली चुप्पी 

भाजपकडून अनावश्यक पुलांच्या कामांना मंजुरी दिली जात असताना विरोधकांनी देखील चुप्पी साधल्याने भाजपच्या साथीला विरोधक आल्याचे दिसून आले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटर, बेडची संख्या कमी असताना त्यावरून नगरसेवकचं ओरड करतात. आज अनावशक्‍य निधी या बाबींकडे वळविण्याची संधी असताना विना चर्चा पुलांना मंजुरी देण्यात आली. 

गटनेत्यांची मागणी फेटाळली 

भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्या बरोबरच दोन पुलांसह बांधकाम विषयक अन्य कामे थांबवून तो निधी आरोग्य व वैद्यकीय विभागाकडे वळविण्याची मागणी करणारे पत्र सभापती गणेश गिते यांच्याकडे दिले परंतू ते पत्र स्विकारण्यास नकार देत मागणी फेटाळली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com