esakal | नाशिक परिघात आठवडाभरात कोविड रुग्णालयाची व्यवस्था..ऍपद्वारे अलर्ट अन्‌ दारात पोचणार रुग्णवाहिका 
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient 1.jpg

नाशिकच्या परिघामध्ये येत्या आठवड्याभरात समर्पित कोविड रुग्णालयाची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्पष्ट केले, तसेच "हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट'मधील 709 आणि होम क्वारंटाइन केलेले 522 अशा एक हजार 231 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.​

नाशिक परिघात आठवडाभरात कोविड रुग्णालयाची व्यवस्था..ऍपद्वारे अलर्ट अन्‌ दारात पोचणार रुग्णवाहिका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या परिघामध्ये येत्या आठवड्याभरात समर्पित कोविड रुग्णालयाची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्पष्ट केले, तसेच "हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट'मधील 709 आणि होम क्वारंटाइन केलेले 522 अशा एक हजार 231 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हजार जणांची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. 

आठवडाभरातच कोविड रुग्णालयाची व्यवस्था 
आठवड्यातून दोनदा तापमान आणि रक्तामधील ऑक्‍सिजन तपासला जाईल. त्यात विशेषतः चार हजार 425 मधुमेह, सहा हजार 275 उच्च रक्तदाब आणि 860 इतर अशा 11 हजार 560 दुर्धर आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. संदीप फाउंडेशनमध्ये कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सद्यःस्थितीत शंभर खाटांची व्यवस्था आहे. येथे 28 रुग्ण आहेत. याच ठिकाणी आणखी 100 खाटांचा विस्तार केला जाणार आहे. देवळाली कॅम्पमधील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात 75 खाटा असून, 29 रुग्ण उपचार घेत आहेत. दहा संशयित रुग्ण आहेत. तसेच जिल्हा सरकारी रुग्णालयात 18 रुग्ण उपचार घेत आहेत. देवळाली कॅम्पमध्ये शाळेत शंभर खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती बनसोड यांनी दिली. "सकाळ'मध्ये रविवारी "नाशिकचा परीघ तापाने फणफणतोय' या आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने केलेल्या तयारीची माहिती त्यांनी दिली. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

महिनाभर रोगप्रतिकारशक्तीवर्धक औषध देणार 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुर्धर आजार असलेल्या ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाची यंत्रणा साडेतीन लाख जणांपर्यंत पोचली आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. स्वयंसेवी संस्था, डॉक्‍टर, जिल्ह्याचा निधी यातून महिनाभर रोगप्रतिकारशक्तीची औषधे देण्यात येणार आहेत. याखेरीज यापूर्वी 32 व्हेंटिलेटरची खरेदी केली होती. आता आणखी 30 व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे, असेही श्रीमती बनसोड यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

ऍपद्वारे अलर्ट अन्‌ दारात पोचणार रुग्णवाहिका 
आरोग्यसेवक आणि शिक्षकांच्या माध्यमातून आठवड्यातून दोनदा तापमान आणि रक्तातील ऑक्‍सिजन प्रमाण तपासल्यानंतर मोबाईलद्वारे त्याच्या आकडेवारीसह लक्षणांची माहिती पाठविली आहे. ही माहिती सर्व्हरवर जनरेट होईल. त्यातून आरोग्य यंत्रणेपर्यंत अलर्ट पोचेल. गरज भासलेल्यास लगेच रुग्णवाहिका दारात पाठवून वैद्यकीय इलाजाची व्यवस्था करण्यात येईल. या ऍपचा प्रायोगिक वापर सिन्नर तालुक्‍यात आठवड्यात केला जाईल. त्यातील अडचणी दूर करत आणखी अपडेट करत ही व्यवस्था जिल्हाभर वापरली जाईल, असेही बनसोड यांनी सांगितले.