कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी खेळाची व्यवस्था.. महापालिका आयुक्तांनी दिल्या सुचना

विक्रांत मते
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (ता. ३१) नव्याने तयार होत असलेल्या ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी करून सूचना दिल्या. ठक्कर डोम येथे दिल्या जाणाऱ्या सुविधा व रुग्णांसाठी खाटांबाबत माहिती घेतली.​

नाशिक : महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (ता. ३१) नव्याने तयार होत असलेल्या ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी करून सूचना दिल्या. ठक्कर डोम येथे दिल्या जाणाऱ्या सुविधा व रुग्णांसाठी खाटांबाबत माहिती घेतली.

बुद्धिबळासारख्या खेळांची व्यवस्था करण्याच्या सूचना
ठक्कर डोम येथील कोरोना कक्षात स्वतंत्र घंटागाडी, अग्निशमन दलाचे वाहन नियमित ठेवण्याची व्यवस्था करावी, नियमितपणे स्वच्छता राहील यादृष्टीने नियोजन करणे, आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, येथे ठेवलेल्या खाटा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती घेतली. रुग्णांसाठी योगा, बुद्धिबळासारख्या खेळांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, हेमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, डॉ. दिलीप मेणकर, ठक्कर डोम कोरोना कक्षाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी, नवीन बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?
 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement of play for patients at Thakkar Dom Covid Center nashik marathi news