
नाशिक : कोरोनामुळे घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेची दमछाक होत असताना दोनशे कोटींच्या घरात पोचलेली थकबाकी वसूल करण्यासाठी आता नव्याने अभय योजना लागू केली जाणार आहे. त्याअंतर्गत थकबाकीची रक्कम अदा करणाऱ्या करदात्यांना शास्तीमध्ये पहिल्या महिन्यात ७५, दुसऱ्या महिन्यात ५०, तिसऱ्या महिन्यात २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
अपेक्षित घरपट्टी व पाणीपट्टी वसुली नाही
घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मुख्यतः मार्चमध्ये होते. परंतु मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला. जूननंतर लॉकडाउनची प्रक्रिया सुरू होती. प्रत्येकाचे अर्थचक्र बिघडल्याने अपेक्षित घरपट्टी व पाणीपट्टी वसुली झाली नाही. त्यामुळे महापालिकेने करवसुलीसाठी प्रोत्साहनपर सवलत योजना अमलात आणली. त्यात एप्रिलमध्ये घरपट्टी अदा करणाऱ्या करदात्याला पाच, मेमध्ये तीन, तर जूनमध्ये दोन टक्के सवलत देण्यात आली. मात्र योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतरही योजनेला दोनदा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर त्या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
दंडात सवलत देण्याचा निर्णय
गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९३.२२ कोटी रुपये महसूल मिळाला. परंतु या वर्षी अवघे ५८.११ कोटी रुपये मिळाले. ऑक्टोबरमध्ये घरपट्टीत ३५ कोटींची तूट नोंदविण्यात आली. पाणीपट्टीची तूट पावणेतेरा कोटी रुपये नोंदविली गेली. त्यामुळे करवसुलीसाठी महापालिकेने अभय योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. घरपट्टीची चालू वर्षाची मागणी व गेल्या वर्षाची थकबाकी जवळपास २०० कोटींपेक्षा अधिक पोचल्याने दंडात सवलत देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती विविध कर उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.