चांदवडच्या शेतकऱ्याचा धक्कादायक कारनामा! तुरीच्या शेतात चक्क गांजाची लागवड; पोलिसही चक्रावले

भाऊसाहेब गोसावी
Monday, 12 October 2020

एरव्ही शेतकरी म्हटलं की शेतात भाजीपाला, बाजरी, मका, फळबागा किंवा कडधान्ये सारखी पिके घेऊन प्रचंड कष्ट हेच चित्र डोळ्यासमोर येते.मात्र चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

चांदवड (जि. नाशिक)  : एरव्ही शेतकरी म्हटलं की शेतात भाजीपाला, बाजरी, मका, फळबागा किंवा कडधान्ये सारखी पिके घेऊन प्रचंड कष्ट हेच चित्र डोळ्यासमोर येते.मात्र चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्याचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले

राज्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले अशात कानमंडाळे ता.चांदवड येथील दत्तू चौधरी या शेतकऱ्याचा कारनामा काही औरच. दत्तू चौधरी हे चांदवड तालुक्यातील कानमंडाळे गावात राहणारे आहे. चांदवडच्या कानमंडाळे भागात एका शेतकऱ्याने त्याच्या तुरीच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याची माहिती नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

गावात एकच खळबळ

त्यानंतर  पोलीस अधिक्षक सचिन पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक  शर्मिष्ठा वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना तुरी सोबत गांजाची झाडांची लागवड करण्यात आल्याचे दिसून आले.तुरीच्या शेतात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 230 झाडे लावण्यात आली होती. दत्तू चौधरीचा प्रताप पाहून पोलीसही हैराण झाले.  पोलिसांनी तुरीच्या शेतातून गांजाची तब्बल 230 झाडे जप्त केली.शेतात गांजाची झाडे लावल्याप्रकरणी दत्तू चौधरी या शेतकऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी दत्तू चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात आणखी कुणी गांजाची लागवड केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहे. कानमंडाळे गावातील शेतामध्ये गांजाची शेती करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested farmer farming Hemp chandwad nashik marathi news