ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

विनोद बेदरकर
Sunday, 4 October 2020

सीमेवर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरण कायम असताना पाकिस्तानातून भारतीय लष्कराच्या हेरगिरीचे प्रकरण उजेडात आले आहे. तोफखाना केंद्रातील लष्कराच्या प्रतिबंधित भागातील छायाचित्र काढून ते व्हॉटसॲप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानला पाठवायचा.

नाशिक : सीमेवर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरण कायम असताना पाकिस्तानातून भारतीय लष्कराच्या हेरगिरीचे प्रकरण उजेडात आले आहे. ठेकेदाराचा मजूर म्हणून कार्यरत असलेल्या एकाने नाशिक रोड तोफखान्यातील संवेदनशील छायाचित्र पाकिस्तानला पाठविल्याचे उघडकीस आले. 

लष्करातील गोपनीय विभागावर पाळत

लष्कराच्या गोपनीय विभागाने पाळत ठेवून बिहारमधील संशयिताच्या मुसक्या आवळून पोलिसांच्या ताब्यात दिले. संजीवकुमार (वय २१, रा. आलापूर, पो. सुनबरसा, जि. गोपालगंज, बिहार) असे हेरगिरी करणाऱ्या संशयिताचे नाव असून, तो देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक परिसरात चिंतामण बस स्टॉपजवळील पडक्या शेडमध्ये राहून पाकिस्तानासाठी हेरगिरी करीत होता. काही दिवसांपासून लष्करातील गोपनीय विभाग (आर्मी इन्टलिजन्स) त्याच्यावर पाळत ठेवून होता. 

व्हॉटसॲप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानला फोटो सेंड

शुक्रवारी (ता.२) सायंकाळी साडेसातला तोफखाना केंद्रातील एमएच गेट भागात लष्कराच्या प्रतिबंधित भागातील छायाचित्र काढून ते व्हॉटसॲप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानला पाठविताना त्याला पकडण्यात आले. दोन दिवस लष्करी प्रशासनाने कसून चौकशी केल्यानंतर शनिवारी (ता. ३) त्यांच्याविरोधात लष्करातर्फे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला. आर्मी इन्‍टलिजन्सचे यश तोफखाना केंद्रात विविध कामे ठेकेदारांकडून करून घेतली जातात. संशयित संजीवकुमार हा अशाच ठेकेदाराचा मजूर म्हणून तोफखाना केंद्रात यायचा.

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!

मुसक्या आवळून पोलिसांच्या स्वाधीन

सायंकाळी काम सुटल्यानंतर मजूर परतायचे. पण हा मात्र उशिरापर्यंत तोफखान्यात रेंगाळायचा. बाहेरील व्यक्तींना मोबाईल वापराला प्रतिबंध असताना त्याच्याकडे मोबाईल असल्याचे लक्षात आल्याने आर्मी इन्‍टलिजन्स त्याच्यावर पाळत ठेवून होते. शुक्रवारी सायंकाळी त्याने पाकिस्तानला छायाचित्र पाठविल्यानंतर काही वेळातच त्याच्या मुसक्या आवळून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा >  लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for spying artillery for Pakistan nashik marathi news