एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीचा लासलगावला पर्दाफाश; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अरुण खांगळ
Sunday, 18 October 2020

एटीएममधून पैसे काढणासाठी गेलेल्या अरुण यांनी मागे असलेल्या व्यक्तीची मदत घेतली. मात्र त्या व्यक्तीने लढविली वेगळीच शक्कल. अखेर त्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटल्याने चांगलीच फजिती झाली. वाचा काय घडले?

नाशिक : (लासलगाव) एटीएममधून पैसे काढणासाठी गेलेल्या अरुण यांनी मागे असलेल्या व्यक्तीची मदत घेतली. मात्र त्या व्यक्तीने लढविली वेगळीच शक्कल. अखेर त्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटल्याने चांगलीच फजिती झाली. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

लासलगाव येथील एटीएममधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर (आंबेडकर नगर, रा. म्हरळगाव, कल्याण) यास लासलगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. तर पकडलेल्या आरोपीला सोमवार (ता.१९) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.१६) दुपारच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये अरुण कदम (रा. निळखेडे, ता. येवला) हे एटीएममधून पैसे काढत असताना पैसे बाहेर येत नसल्याने मागे उभ्या असलेल्या आरोपीची मदत घेतली. आरोपीने त्याच्याकडील बनावट कार्डच्या साह्याने पैसे काढण्याचा प्रयत्न फसला. त्याला लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र दोन साथीदार फरार झाल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीने साथीदारांसह देवळा, येवला, लोहा (जिल्हा बीड) येथुन अशाप्रकारे पैसे काढल्याचे कबूल केले. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँक्सची बनावट एटीएम कार्ड व अँड्रॉइड मोबाईल सापडला. तसेच रोख रक्कम ५१ हजार रूपये पोलिसांनी हस्तगत केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंधवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, पुढील तपास करत आहे.  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM withdrawals Gang exposed in Lasalgaon nashik marathi news