esakal | धक्कादायक! नातेवाईकांची उलट शिवीगाळ करत डॉक्टरांनाच मारहाण..कोविड केअर सेंटरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

corona medical team.jpg

कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे सर्व आपला जीव धोक्यात घालून नागरिकांवर उपचार करत असल्याने सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र याच देवदूतांना शिवीगाळ करत त्याच्यावर थेट दगडफेकीचाही प्रयत्न झाला.काय घडले नेमके?

धक्कादायक! नातेवाईकांची उलट शिवीगाळ करत डॉक्टरांनाच मारहाण..कोविड केअर सेंटरमधील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे सर्व आपला जीव धोक्यात घालून नागरिकांवर उपचार करत असल्याने सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र याच देवदूतांना शिवीगाळ करत त्याच्यावर थेट दगडफेकीचाही प्रयत्न झाला.काय घडले नेमके?

असा घडला प्रकार

येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील एका महिलेसह त्यांच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल सोमवारी (ता. २०) सकाळी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्यांना बाभूळगाव येथील क्वारंटाइन सेंटरमधून नगरसूल येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. या ६५ वर्षीय महिला रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार होता, तसेच त्यांची ॲन्जिओप्लास्टी देखील झालेली होती. यामुळे त्यांचावर आयसीएमआरच्या नियमानुसार योग्य पद्धतीने उपचार सुरू होते. सोमवारी रात्री या महिलेला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तातडीने ऑक्सिजनसह सर्व अत्यावश्‍यक औषधोपचार केले.

डॉक्टरांना शिवीगाळ करत दगडफेक
मात्र उपचारादरम्यान या महिलेचे निधन झाले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाइकांनी येथील कोविड केअर सेंटरवर जमा होत येथील डॉक्टरांना शिवीगाळ करत डॉक्टरांवर दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात वैद्यकीय अधिकारी साहेबराव मदनुरे, कोविड केअर सेंटरप्रमुख डॉ. आनंद तारू, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड थोडक्यात बचावले. या घटनेचा डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

संबंधितांवर कारवाई करा

कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे सर्व आपला जीव धोक्यात घालून नागरिकांवर उपचार करत असल्याने सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र याच देवदूतांना शिवीगाळ करत त्याच्यावर थेट दगडफेकीचाही प्रयत्न झाला. डॉक्टरांनी योग्य आणि वेळेवर उपचार न केल्याने नगरसूल (ता. येवला) येथील कोविड केअर सेंटरमध्ये सोमवारी (ता.२०) मृत्यू झालेल्या महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी येथील डॉक्टरांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रत्यन केला. या घटनेचा आरोग्य विभागातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला असून, संबंधितांवर कारवाई करण्याबरोबर यापुढे असे प्रकार घडणार नाही, यासाठी संरक्षण देण्याची मागणी प्रांताधिकारी सोपान कासार व तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे येथील आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन 

 डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यावर असा हल्ला होणे, हे अत्यंत निंदनीय आहे. अशा घटनांमुळे आरोग्य सेवा देण्यात अडचणी निर्माण होऊन रुग्णाच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे या घटनेत सर्व दोषींवर तत्काळ कारवाई करत अशा घटना पुन्हा घडू नये, याकरिता डॉक्टर व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे.\

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!