जेव्हा डॉक्टरकडूनच होतो आरोग्य पथकावर हल्ला व शिवीगाळ; दिंडोरीतील धक्कादायक प्रकार

रामदास कदम
Saturday, 19 September 2020

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाकडून आरोग्य विभागातील सहकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते. आणि दुसरीकडे मात्र डॉक्टरकडूनच आरोग्य पथकावर हल्ला आणि शिवीगाळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला 

नाशिक / दिंडोरी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाकडून आरोग्य विभागातील सहकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते. आणि दुसरीकडे मात्र डॉक्टरकडूनच आरोग्य पथकावर हल्ला आणि शिवीगाळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला 

जेव्हा डॉक्टरकडूनच होतो आरोग्य पथकावर हल्ला
शहरातील शिवाजीनगर भागत राहणारे डॉ. ज्ञानराज देसले यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेण्यासह कंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी त्यांच्या घरी तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र दोनचे आरोग्यसेवक ए. ए. सय्यद, राजेंद्र जगताप, गटप्रवर्तक ज्योती जाधव, आशा कार्यकर्ती अश्विनी गांगुर्डे गेले असता, डॉ. देसले यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत, अंगावर धावून येत धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर डॉ. देसले यांच्या आई यांनी पथकातील महिला कर्मचारी समोर जमिनीवर डोके आपटत आत्महत्या करण्याची धमकी देत घरातून निघून जाण्यास सांगितले. 
यानंतर श्री. सय्यद यांच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

तक्रारीनंतर डॉ. देसले यांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील

शहरातील एका डॉक्टरचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीय व संपर्कातील लोकांची माहिती संकलित करण्याकरिता गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकावर डॉक्टर व त्याच्या आईने शिवीगाळ व हल्ला करत माघारी धाडले. याप्रकरणी डॉक्टर व त्यांच्या विरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर डॉ. देसले यांचे निवासस्थान व हॉस्पिटल परिसर सील करण्यात आले असून, परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. डॉक्टराकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्याने संपूर्ण दिंडोरीत या प्रकारची चांगलीच चर्चा रंगली होती.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on health squad from doctor nashik marathi news