ग्राहकांच्या खात्यातून होणार "ऑटो डेबिट".. बॅंकांच्या नियमात बदल

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

कोविड संसर्गामुळे सरकारने जनतेसाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. यातील काही सवलतींची मुदत  संपल्याने अटल पेन्शन योजना, विविध बॅंका नियमांमध्ये  1 जुलैपासून बदल करणार असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

नाशिक : कोविड संसर्गामुळे लॉकडाउन केल्याने आर्थिक संकट उभे राहिल्याने सरकारने जनतेसाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. यातील काही सवलतींची मुदत मंगळवारी (ता. 30) संपल्याने अटल पेन्शन योजना, विविध बॅंका नियमांमध्ये बुधवार (ता. 1)पासून बदल करणार असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

अटल पेन्शन योजना 
सरकारने अटल पेन्शन योजनेमध्ये बदल करण्याची घोषणा केली असून, 1 जुलैपासून या योजनेच्या खात्यामधून मासिक हप्त्याचे ऑटो डेबिट सुरू होणार आहे. कोविड संकट व लॉकडाउनमुळे पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍन्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने 30 जूनपर्यंत बॅंकांना पेन्शन फंडाचे ऑटो डेबिट थांबविण्याचे आदेश दिले होते. ही मुदत मंगळवारी (ता. 30) संपल्याने 1 जुलैपासून ऑटो डेबिट पुन्हा सुरू होणार आहे. 30 सप्टेंबर 2020 पूर्वी पेन्शन स्कीम अकाउंट नियमित केल्यास विलंब काळात झालेल्या दंडावर ग्राहकाला व्याज आकारले जाणार नाही, असे पीएफआरडीएने नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी राबविली जाते. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

व्याजदरात कपात 
पंजाब नॅशनल बॅंक बचत खात्यावरील रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या दरात 0.50 टक्‍क्‍यांनी कपात करणार असून, 1 जुलैपासून जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षिक व्याजदर मिळेल. 50 लाखांपर्यंत 3 टक्के, तर 50 लाखांहून अधिक रकमेवर 3.25 टक्के व्याजदर मिळेल. एसबीआय व कोटक महिंद्राने यापूर्वीच बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

एटीएमसाठी पुन्हा शुल्क 
एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही 1 जुलैपासून बदल होणार असून, ते ग्राहकाच्या खिशाचा बोजा वाढविणार आहेत. अर्थमंत्रालयाने कोविड संकटामुळे पैसे काढण्यासाठीचे सर्व ट्रॅंझॅक्‍शन शुल्क तीन महिन्यांसाठी हटविले होते. त्याची मुदत 30 जूनला संपली आहे. 

बदलांवर एक दृष्टिक्षेप 
- अटल पेन्शन योजनेच्या मासिक हप्त्यांचे ऑटो डेबिट सुरू होणार. 
- एटीएमचे शुल्क पुन्हा सुरू. 
-  व्याजदरात कपात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Debit from Consumer Account Changes in Banking Rules nashik marathi news