esakal | बॅग गायब म्हटल्यावर...डोळ्यासमोर अंधारीच...पण, नंतर जे घडलं ते आश्चर्यकारकच!
sakal

बोलून बातमी शोधा

nashikroad-police.jpg

बॅंकेत भरणा करण्यासाठी म्हणून त्या दुचाकीवरुन बॅंकेकडे निघाल्या...अन् जेव्हा बॅंकेत पोहचल्या अन् धक्काच...बॅग तर गायब?...त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली...धावत-पळत पोलीस स्टेशनला पोहचल्या अन्...बॅग समोरच दिसली...बॅग गाडीवरुन पोलीस स्टेशनला कशी त्यांना आश्चर्यच अन् मग...

बॅग गायब म्हटल्यावर...डोळ्यासमोर अंधारीच...पण, नंतर जे घडलं ते आश्चर्यकारकच!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : बॅंकेत भरणा करण्यासाठी म्हणून त्या दुचाकीवरुन बॅंकेकडे निघाल्या...अन् जेव्हा बॅंकेत पोहचल्या अन् धक्काच...बॅग तर गायब?...त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली...धावत-पळत पोलीस स्टेशनला पोहचल्या अन्...बॅग समोरच दिसली...बॅग गाडीवरुन पोलीस स्टेशनला कशी त्यांना आश्चर्यच अन् मग...

अशी घडली घटना

मनिषा नितीन आडके (रा. अभिनंदन लॉन्स, लॅमरोड, देवळाली कॅम्प) या शनिवारी (ता. ६) सकाळी १० वाजेच्या सुमारास लॅमरोडने देवळाली कॅम्पमधील बँकेत भरणा करण्यासाठी जात होत्या. दुचाकीवरुन जात असताना त्यांची रोकड, दोन मोबाईल व महत्वाची कागदपत्र असलेली बॅग ओरिएंट गेस्ट हाऊसच्या समोर पडली. त्यावेळी देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे जाणारा सुनील ननसू साळवे (रा. शिगवे बहुला) याच्या बॅग पडल्याचे लक्षात आले. त्याने दुचाकी वळवुन बॅग उचलून पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू निसाळ यांच्या हस्ते आडके यांना त्यांची बॅग परत केली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

बॅगेत ४२ हजार १७० रुपये व दोन मोबाईल व कागदपत्रे सुरक्षित असल्याचे पाहून आडके यांनी युवकाच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार व्यक्त करत बक्षीस दिले. युवकाची तत्परता व प्रामाणिकपणामुळे अवघ्या अर्ध्या तासात बॅग पैशांसह परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. आडके यांनी नाशिकरोड पोलीस व युवकाचे आभार मानले.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

go to top