थर्टी फर्स्टसाठी निसर्ग पर्यटनस्थळांवर जाणे पडेल महागात; रात्र जागवण्याचा तरुणाईचा मनसुबा होईल फ्लॉप!

woman mount.jpg
woman mount.jpg

इगतपुरी (नाशिक) : निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक वनपरिक्षेत्रात असलेले गड, किल्ले, डोंगर तसेच धबधबे आदी नैसर्गिक पर्यटनस्थळी ३१ डिसेंबरच्या रात्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व अन्य शासन यंत्रणांच्या नजरा चुकवत ब्रह्मगिरी, गंगाद्वार आणि लगतच्या डोंगरावर तसेच हरिहर किल्ला, अंजनेरी गड, पहिणेबारी, दुगारवाडी, कावनई किल्ला, कसारा घाट, कळसुबाई शिखर, वैतरणा, भावली दारणा, मुकणे धरण, त्रिंगलवाडी किल्ला, भंडारदरा परिसर आदी ठिकाणी ३१ डिसेंबरची रात्र जागवण्याचा मनसुबा तरुणाईला पूर्ण करता येणार नाही. 

वनखात्याकडून चोख बंदोबस्त; धांगडधिंग्याला आळा 
इगतपुरी परिसरासह त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गस्थळांवर यावर्षी गुरुवारी सायंकाळी सहानंतर थांबता येणार नाही. यासाठी वनखात्याने वनरक्षक तसेच स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या मदतीने बंदोबस्त लावण्याचे ठरविले आहे. दिवसा गड किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना सायंकाळी सहाच्या आत परत येण्याची सूचना देण्यात येणार आहे. तसेच पाथ्याशी असलेले वनव्यवस्थापन समिती सदस्य अथवा वनरक्षक त्यांची लेखी नोंद करून घेतील. सायंकाळी सहानंतर कोणीही गड, किल्ले, डोंगर अथवा धबधबे या ठिकाणी जाणार नाही. दिवसा तेथे गेलेले थांबणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे यावर्षी निसर्ग पर्यटनस्थळावर आपसूकच कर्फ्यू लागणार आहे. 

मद्यपींचा धुडगूस टाळणार 
गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागताचे निमित्त करत निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली पर्यटनस्थळांवर पार्टी करून धांगडधिंगा घालून धुडगूस घालण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही काळात या भागात निसर्ग सहलींच्या नावाने गर्दी होतच असते. मात्र नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करत धुडगूस घालणाऱ्या मंडळीचा शांतता असलेल्या परिसरात वावर वाढला आहे. यावर वनखात्याने यावर्षी चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी ठेवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com