सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 29 December 2020

आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांच्या 
जिवावर बेतू लागले आहेत. पोलिस, महसूल प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही आणि पोलिसांनी कारवाई करूनदेखील धोका आजही कायम असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. 

 नाशिक : आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांच्या जिवावर बेतू लागले आहेत. पोलिस, महसूल प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही आणि पोलिसांनी कारवाई करूनदेखील धोका आजही कायम असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. 

जीवघेणा धोका आजही कायम
द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ उड्डाणपुलावर हा प्रकार घडला. भारती मारुती जाधव (वय ४६, रा. अंबड) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. भारती जाधव पंचवटीतील हिरावाडीत जात असताना मांजाने गळा कापून सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. हिरावाडीतील रहिवासी असलेल्या भारती जाधव अंबड एमआयडीत कामाला होत्या. त्या सोमवारी कामावरून सुटी झाल्यानंतर दुचाकीवरून हिरावाडीकडे निघाल्या होत्या. द्वारका उड्डाणपुलावरून जात असताना पतंगाचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्‍थेत रस्त्यावर पडल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांच्या जिवावर
मात्र, तोपर्यंत मोठा रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला, मृत महिलेच्या भावाने ओळख पटविली. भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दखल झाला आहे. वर्षातील नायलॉन मांजामुळे महिलेच्या रूपात पहिला बळी गेला आहे. आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांच्या 
जिवावर बेतू लागले आहेत. पोलिस, महसूल प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही आणि पोलिसांनी कारवाई करूनदेखील जीवघेण्या मांजाचा धोका आजही कायम असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

गुन्हे दाखल करा 

पंतगाच्या धोकादायक नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचेच नव्हे, तर माणसांचाही जीव जाऊ लागला आहे. सोमवारी (ता. २८) नाशिकला सायंकाळी द्वारका परिसरात मांजामुळे गळा कापून महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र असून, पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी धोकादायक मांजानिर्मिती, वाहतूक, विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच पतंग उडविण्यासाठी धोकादायक मांजा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वाढली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lady died by nylon rope nashik marathi news