खुली मिठाई, दुग्धजन्य पदार्थांवर 'बेस्ट बिफोर डेट' बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई

सतीश निकुंभ
Wednesday, 30 September 2020

आस्थापनेत विक्री होणाऱ्या खुल्या मिठाईवर 'बेस्ट बिफोर डेट' प्रदर्शित करावे, असे आवाहन करून या तरतुदीचे उल्लंघन शिक्षेस पात्र आहे, असे श्री. साळुंखे यांनी सांगितले. सातपूर परिसरातील अशोकनगर येथील मिठाई विक्रीसंदर्भातही तक्रारी वाढत असून, यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  

नाशिक : (सातपूर) मिठाई व दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्यापासून मानवी शरीरावर दुष्परिणाम व विषबाधेची शक्यता गृहीत धरून अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी ग्राहकांना खुल्या स्वरूपात मिठाई सुरक्षित मिळण्यासाठी १ ऑगस्टपासून खुल्या मिठाईला 'बेस्ट बिफोर डेट' प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे, असे अन्न व सुरक्षा विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितले.

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

मिठाईवर 'बेस्ट बिफोर डेट' प्रदर्शित करावे...

या संदर्भात सहआयुक्त श्री. साळुंखे यांच्या दालनात शहरातील प्रमुख मिठाई उत्पादक, विक्रेते व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता. २९) बोलविण्यात आली. बैठकीस सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर उपस्थित होते. प्रशासनातर्फे नवीन आदेशाबाबत सर्व उपस्थितांशी चर्चा झाली. उपस्थितांनी मिठाईवर अशा प्रकारे 'बेस्ट बिफोर डेट' टाकण्याबाबत आश्वासित केले आहे. सर्व मिठाई उत्पादक, विक्रेते, हलवाई, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेत विक्री होणाऱ्या खुल्या मिठाईवर 'बेस्ट बिफोर डेट' प्रदर्शित करावे, असे आवाहन करून या तरतुदीचे उल्लंघन शिक्षेस पात्र आहे, असे श्री. साळुंखे यांनी सांगितले. सातपूर परिसरातील अशोकनगर येथील मिठाई विक्रीसंदर्भातही तक्रारी वाढत असून, यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best before date binding on open sweets, dairy products nashik marathi news