esakal | विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

ashwini.jpg

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे विषारी औषध सेवनाने मृत्यू महिलेचा मृत्यू झाला. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी  व संप्तत नातेवाईकांनी तिचे शव सासरच्या घरासमोरच दहन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले वाचा... 

विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

नाशिक : (वणी) दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे विषारी औषध सेवनाने मृत्यू महिलेचा मृत्यू झाला. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी  व संप्तत नातेवाईकांनी तिचे शव सासरच्या घरासमोरच दहन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले वाचा... 

अशी आहे घटना

दोन दिवसांपुर्वी शनिवारी (ता. 26) निळवंडी येथील विवाहिता अश्‍विनी किरण पताडे हिने औषध सेवन केल्याने तिला नाशिक येथे रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. 'सासरच्याच लोकांनी तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजले' असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला. तिचे माहेर आडगाव (ता. नाशिक) येथील आहे. तिचे शव दिंडोरीला आणण्यात आले. माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. दिंडोरी पोलिस ठाण्यात सर्व नातेवाईक जमा झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह घेऊन निळवंडी येथे नेऊन सासरच्या घरासमोरच अंत्यविधी केला. सासरच्या लोकांनी फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी पूर्ण केली नाही. तसेच घरगुती काम व शेतीचे काम करत नाही, अशा कारणांवरुन शारिरिक व मानसिक छळ करुन व तिच्यावर चारित्र्यावर संशय घेत त्रास देत होते. असे अश्विनीच्या माहेरची तक्रार आहे.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

अश्विनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती किरण संजय पताडे, सासरा संजय पताडे, सासू कल्पना पताडे, दीर रोशन पताडे व नंदई तुषार दयाळ, नंनद मोनिका दयाळ यांच्याविरुध्द भा.द.वि.कलम 306, 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे विवाहितेचे वडील भाऊसाहेब दगु हळदे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांच्यासह पोलिस हवालदार करीत आहे.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

go to top