अरेच्चा! सरड्याला बघण्यासाठी पोलीस चौकीजवळच जमली गर्दी? भरचौकात फोटोशुट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

सकाळची वेळ...भरचौकात जमलेली गर्दी बघून जो तो धावतच गर्दीकडे जात होता. कुणी फोटो काढतंय, तर कुणी व्हिडीओ. त्यातल्या त्यात गर्दी होती पोलिस चौकीजवळ? असं काय होते तिथे की बघ्यांची तुफान गर्दी जमली...? वाचा काय घडले?

नाशिक : (देवळाली कँम्प) सकाळची वेळ...भरचौकात जमलेली गर्दी बघून जो तो धावतच गर्दीकडे जात होता. कुणी फोटो काढतंय, तर कुणी व्हिडीओ. त्यातल्या त्यात गर्दी होती पोलिस चौकीजवळ? असं काय होते तिथे की बघ्यांची तुफान गर्दी जमली...? वाचा काय घडले?

असा आहे प्रकार

भगूर पोलीस चौकीजवळ मंगळवारी (ता. 29) सकाळी तुफान गर्दी जमली होती. काहींना वाटले भांडण झाले तर काहींना वाटले काय तरी नवीन आहे. जो तो गर्दी करत होता. तेथे रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली होती. सदर सरडा फक्त झाडावर वावर असतो. तो सरडा भगूर पोलीस चौकी समोरील कॉक्रीटीकरण रस्तावर दिसताच ये - जा करणारे अनेक नागरिक मोठा व वेगळाच सरडा बघून मोबाईल मध्ये फोटो काढून घेत होते. शामिलिन सरडा दाट झाडांवरच आढळून येतो. अनेक ठिकाणी झाडे तोडल्यामुळे व कीटक नाशक वापरल्यामुळे संख्या खूप कमी झाल्याचे प्राणी मित्र रोहन जगताप यांनी सांगितले. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

साडेबारा वाजेच्या दरम्यान वननिभागाचे वनरक्षक विजय पाटील, प्राणीमित्र रोहन जगताप, आशिष पवार, मनोज जगताप, प्रथमेश भवर व मंगेश परदेशी यांच्या सहकार्याने त्याला आदिवसी भागात सोडण्यात आले. सदर शामिलिन लिझर जातीचा सारडा आदिवासी पट्ट्यात पावसाळ्यात आढळतो. 

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Bhagur found a shamilin lizard of the species nashik marathi news