घरखर्च भागविण्यासाठी वडिलांसोबत लावले पिको-फॉल...भाग्यश्रीच्या यशाने आईच्या कष्टाला कोंदण! 

प्रमोद सावंत
Wednesday, 29 July 2020

 शेतीतल्या नापिकीचा फटका बसल्याने शहरातील घरास भाड्याने देत त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात आई सरला पवार यांचे ध्येय मुलीला अधिकारी बनविण्याचे आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी बापासह पिको-फॉल लावून घरखर्चास हातभार लावणाऱ्या पवार दांपत्याच्या भाग्यश्रीने कष्टाला कोंदण लावले. कसे ते वाचा..

नाशिक / मालेगाव कॅम्प : शेतीतल्या नापिकीचा फटका बसल्याने शहरातील घरास भाड्याने देत त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात आई सरला पवार यांचे ध्येय मुलीला अधिकारी बनविण्याचे आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी बापासह पिको-फॉल लावून घरखर्चास हातभार लावणाऱ्या पवार दांपत्याच्या भाग्यश्रीने कष्टाला कोंदण लावले. कसे ते वाचा..

शेतकरी बापासह पिको-फॉल लावून घरखर्चास हातभार लावला

वऱ्हाणे (ता. मालेगाव) येथील शेतकरी हेमंत पवार यांची कन्या भाग्यश्री सातत्याने अभ्यास, जिद्दीने यशाची झेप घेत आरबीएच कन्या विद्यालयामधून प्रथम आली. लहानपणापासून हुशार असलेल्या भाग्यश्रीने निबंध, वक्तृत्वासह फुटबॉल खेळात प्रावीण्य मिळविले आहे. कला क्षेत्रात आवड असणाऱ्या भाग्यश्रीचा अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते सत्कार झाला. लेक वाचवा-लेक शिकवा संदेश देणाऱ्या युगात लेकींच्या यशाने आई-बापाच्या कष्टाला यश लाभत आहे. दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी बापासह पिको-फॉल लावून घरखर्चास हातभार लावणाऱ्या पवार दांपत्याच्या भाग्यश्रीने ९८ टक्के गुण मिळवून कष्टाला कोंदण लावले. 

हेही वाचा > संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली.. खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

आई सरला पवार यांचे मुलीला अधिकारी बनविण्याचे ध्येय

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात आवडीने सहभागी होत, प्रामाणिकपणा व नावीन्यपूर्ण कृती या गुणांबद्दल शिक्षकांना तिचे कौतुक होते. शेतीतल्या नापिकीचा फटका बसल्याने शहरातील घरास भाड्याने देत त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात आई सरला पवार यांचे ध्येय मुलीला अधिकारी बनविण्याचे आहे. प्राचार्या अलका जोंधळे, संस्कृत शिक्षक हेमंत खैरनार व शिक्षकांनी कौतुक केले. भाग्यश्रीच्या सहावी ते दहावीपर्यंतचा क्लास एस.पी. क्लासेसचे योगेश पवार यांनी मोफत उपलब्ध करून दिला. या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना देत भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत उच्च अधिकारी व्हायचे असल्याचे भाग्यश्रीने सांगितले.  

हेही वाचा > एक होती तान्हुल्याच्या काळजीपोटी गड उतरणारी हिरकणी..अन् एक 'ही'..! घराघरात चर्चा..

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhagyashree pawar success in ssc board exam nashik marathi news