esakal | भवानी डोंगर झाला हिरवागार! तरुणांच्या प्रयत्नाने तीन हजार झाडे डौलताएत जोमाने
sakal

बोलून बातमी शोधा

bhavani donger.jpg

काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या शहरातील तरुणांनी वृक्षलागवड व संवर्धनाचा केलेल्या संकल्पामुळे तालुक्यातील भवानी डोंगर आज हिरवागार झाला असून, याठिकाणी तीन वर्षांत विविध प्रजातीची तीन हजार झाडे जोमाने डौलत आहेत. 

भवानी डोंगर झाला हिरवागार! तरुणांच्या प्रयत्नाने तीन हजार झाडे डौलताएत जोमाने

sakal_logo
By
राजेंद्र अंकार

नाशिक / सिन्नर : काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या शहरातील तरुणांनी वृक्षलागवड व संवर्धनाचा केलेल्या संकल्पामुळे तालुक्यातील भवानी डोंगर आज हिरवागार झाला असून, याठिकाणी तीन वर्षांत विविध प्रजातीची तीन हजार झाडे जोमाने डौलत आहेत. 

तरुणांच्या प्रयत्नाने भवानी डोंगर हिरवागार 
तीन वर्षांपूर्वी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अभिजित देशमुख, अमृत सातपुते, संजय विशे, सुनील विशे, उमेश देशमुख, हर्षल आनेराव, संजय चव्हाणके, अभिजित सातपुते, विजय देशमुख या नऊ युवकांनी एकत्र येत पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेतला व पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलायचा, हा ध्यास उरी बाळगत वनप्रस्थ फाउंडेशनची स्थापना करत वृक्षलागवडसह संवर्धन करण्याचा संकल्प केला. 

सिन्नरला तीन वर्षांत तीन हजार वृक्षांची लागवड; पाझर तलावाचेही पुनरुज्जीवन 

वृक्षलागवडीसाठी या युवकांनी सिन्नर-घोटी महामार्गावर भवानी डोंगर निवडत या ठिकाणी वृक्षरोपणास सुरवात केली. पहिल्या वर्षी येथे फाउंडेशनच्या माध्यमातून जपानी ‘मियावाकी’ रोपड्यांची लागवडी करत. श्रीगणेशा करत तीन वर्षांत तब्बल साडेतीन हजार वृक्ष टप्प्याटप्प्याने लावले. वृक्षलागवड व संवर्धनबरोबर याठिकाणी तहानलेल्या वन्यप्राण्यांसाठी पाणवठाही तयार करण्यात आला आहे. वनप्रस्थच्या कामाकामामुळे डाॅ. महावीर खिवंसरा, राजाभाऊ क्षत्रिय, दत्ता बोराडे, सचिन आडणे, संदीप आहेर, सोपान बोडके, सचिन कासार, सौरव आंबेकर, गौरव आंबेकर, अनिल जाधव यांनीही कामात सहभाग घेतला आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा
 
संकटावरही मात 
वृक्षलागवडनंतर या तरुणांना वृक्षसंवर्धन करताना संकटांचादेखील सामना करावा लागला. पहिल्या वर्षी मद्यपीने रोपे पेटवून टाकली. यानंतर या तरुणांनी हार न मानत आणखी रोपे लावली. दुसऱ्या वर्षी दुष्काळामुळे अनेक रोपे जळाली. मात्र तरुणांनी प्रयत्न करत अनेक रोपे वाचविली. झाडे जगविण्यासाठी कायमस्वरूपाची सोय करण्याचे उद्देशाने याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने ठिबक सिंचनाचे प्रयोग राबविल्याने आज सुमारे ९५ टक्केहून अधिक रोपे जिवंत आहे. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

पाझर तलावाचे पुनरुज्जीवन 
काही दिवसांपूर्वी भवानी डोंगरावरच या युवकांच्या नजरेत जुना पाझर तलाव नजरेस पडला. त्याचे पुनरुज्जीवन झाल्यास कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊ शकेल. मग प्रत्येकाने हातात फावडे, कुदळ आणि पाट्या घेत पाझर तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामास सुरवात केली. सध्या त्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

संपादन - ज्योती देवरे