"मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार"

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. 

नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. 

साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी आज त्यांची भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पस मध्ये होत असलेल्या संमेलन स्थळाची नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासोबत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी..

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ याठिकाणी ते काम बघतील असे त्यांनी सांगितले. या पुढे भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य राहील तसेच देशभरातून येणाऱ्या या सर्वांचे स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

यावेळी गोखले एज्युकेशनचे प्रमुख एम.एस.गोसावी, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, भगवान हिरे, संजय करंजकर सुनील भुरे, किरण समेळ, प्राचार्य डॉ.कुलकर्णी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal says government will provide necessary help to make Nashik marathi sahitya samelan quality