esakal | चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप
sakal

बोलून बातमी शोधा

MANMAD23.jpg

आरती ह्या मुलगी हर्षदासोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसने अमरावती ते पुणे प्रवास करत होत्या. तेवढ्यात बोगीत त्या मायलेकींकडे लक्ष ठेवून असलेल्या भामट्याने डाव साधला. अन् त्याने केला धक्कादायक प्रकार की त्या भामट्यासह ती महिलादेखील धावत्या गाडीतून खाली पडली. वाचा नेमके काय घडले?

चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मनमाड (नाशिक) : आरती ह्या मुलगी हर्षदासोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसने अमरावती ते पुणे प्रवास करत होत्या. तेवढ्यात बोगीत त्या मायलेकींकडे लक्ष ठेवून असलेल्या भामट्याने डाव साधला. अन् त्याने केला धक्कादायक प्रकार की त्या भामट्यासह ती महिलादेखील धावत्या गाडीतून खाली पडली. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

हर्षदा दळवी (२४, पुणे) व आरती दळवी (६५, कोंढवा, पुणे) या मायलेकी शनिवारी (ता. 1) महाराष्ट्र एक्स्प्रेसने एस पाच या आरक्षित बोगीतून अमरावती ते पुणे असा प्रवास करीत होत्या. रात्री नऊ वाजता ही गाडी मनमाड स्थानकातून सुटली. संशयिताने बोगीत शिरून त्यांच्या आईच्या हातात अडकविलेली पर्स जबरदस्तीने ओढली. धावत्या गाडीतून चोरटा खाली उतरत असताना आरती यांनी जोरदार प्रतिकार केला. पण चोरटय़ाने त्यांनाही ओढल्याने त्या धावत्या गाडीतून खाली पडून जखमी झाल्या. आरडाओरडीमुळे प्रवासी धावून आले. त्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. जखमी महिलेस गाडीत बसवून घेतले.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

जखमी संशयितास अटक

याबाबत हर्षदाने गाडीत तिकीट तपासनीसाकडे लेखी तक्रार केली. त्यावरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जखमी संशयित आकाश मोरेला (२०, मनमाड) लोहमार्ग पोलिसांनी पकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच