esakal | महत्वाची बातमी : महाविद्यालयीन परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

exam.jpg

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत शैक्षणिक क्षेत्रदेखील प्रभावित झालेले आहे. अशा स्थितीत परीक्षा होणार का, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात कशी असेल, असे असंख्य प्रश्‍न विद्यार्थी व पालकांच्या मनात उद्भवता आहेत. या सर्व बाबींवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.8) फेसबुक लाईव्हद्वारे परीक्षांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.

महत्वाची बातमी : महाविद्यालयीन परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत शैक्षणिक क्षेत्रदेखील प्रभावित झालेले आहे. अशा स्थितीत परीक्षा होणार का, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात कशी असेल, असे असंख्य प्रश्‍न विद्यार्थी व पालकांच्या मनात उद्भवता आहेत. या सर्व बाबींवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.8) फेसबुक लाईव्हद्वारे परीक्षांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. केवळ अंतीम वर्षाच्या अंतीम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ग्रेडद्वारे गुणदान करत त्याआधारे प्रवेश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुमच्या परीक्षा होणार का..
दुपारी एकला फेसबुक लाईव्हला सुरवात झाली. युजीसीकडून प्राप्त गाईडलाईनच्या आधारे सर्व निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षांचा स्वरूप निश्‍चितीसाठी समिती गठीत केलेली होती. या समितीच्या अनेक बैठका झालेल्या आहेत. या दरम्यान युजीसीनेही गाईडलाईन जारी केल्यानंतर सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क साधत त्यांचे मत जाणून घेतले आहे. राज्य शासनातर्फे गठीत समितीच्या निर्णयाशी सहमत असल्याचे सर्व कुलगुरूंनी जाहीर केले आहे. तसेच यासंदर्भात कुलपती तथा राज्यपाल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मसहुल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करत अंतीम निर्णय घेत असल्यचे त्यांनी सांगितले.

हे आहेत महत्त्वाचे निर्णय
- जुलै महिन्यात अंतीम वर्षातील अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.
- युजीच्या सीईटी 20 जुलैपर्यंत तर पीजी अभ्यासक्रमाच्या 31 जुलैपर्यंत घेतल्या जाणार.
- अन्य वर्षांतील विद्यार्थ्यांना आधीच्या कामगिरीच्या आधारे ग्रेड दिले जाईल
- ग्रेडद्वारे गुणांकन करतांना यापूर्वीची कामगिरीवर पन्नास टक्‍के तर सध्याच्या कामगिरीवर पन्नास टक्‍के असे मुल्यांकन असेल.
- या ग्रेडच्या आधारे प्रवेश दिला जाईल.
- ग्रेडमध्ये कमी गुण मिळाल्याचे मत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठे नंतरच्या काळात घेतील परीक्षा
- कमी ग्रेड मिळाल्याने अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल. मात्र आगामी काळात सध्याच्या वर्गाची परीक्षा द्यावी लागणार.
- या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठे त्यांच्या स्तरावर करतील निश्‍चित
- विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर कौन्सिलिंग सेंटर

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'