esakal | विधानसभेच्या उमेदवारीसाठी बिहारी ओबीसी नेत्यांची नाशिकमध्ये धाव! उमेदवारांची छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग  
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections 1.jpg

बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा फीव्हर शिगेला पोचला असून, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याने सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक ओबीसी उमेदवारांनी उमेदवारीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग लावायला नाशिक गाठले आहे. 

विधानसभेच्या उमेदवारीसाठी बिहारी ओबीसी नेत्यांची नाशिकमध्ये धाव! उमेदवारांची छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग  

sakal_logo
By
सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा फीव्हर शिगेला पोचला असून, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याने सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक ओबीसी उमेदवारांनी उमेदवारीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग लावायला नाशिक गाठले आहे. 

उमेदवारीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व भाजपने जागावाटप करताना पहिल्या यादीत जाहीर केलेल्या नावात उमेदवारी मिळाली नाही, अशा इच्छुक उमेदवारांनी आता चिराग पासवान व राष्ट्रवादी काँग्रेसकडे फिल्डिंग लावली आहे. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केल्याने उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची अपेक्षा वाढली आहे.

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

अनेक उमेदवार विरोधी पक्षाकडे जाऊ नये - फडणवीस

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा बिहारमध्ये ओबीसी संघटनांच्या माध्यमातून संपर्क असल्याने नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार व्यावसायिकांमार्फत बिहारी नेते आता उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला नाशिकला आले आहेत. येथील दोन व्यापाऱ्यांमार्फत श्री. भुजबळ यांच्याकडे उमेदवारीसाठी अनेकांनी नाशिकला संर्पक साधला आहे. जेडीयू व भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवार विरोधी पक्षाकडे जाऊ नये म्हणून भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याची धमकी दिली आहे .

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज