esakal | बाबाने बुलाया है!..बाबांच्या दर्शनाची ओढ लागलेल्या कुटुंबावर नियतीचा फेरा..बापलेकीच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच
sakal

बोलून बातमी शोधा

aarya mahajan.jpg

चलो बाबाने बुलाया है.. असं म्हणत सकाळी सातच्या सुमारास पती- पत्नी व मुलगी हे अंतापूर येथील हिंदू- मुस्लिम समाजाचे दैवत दावल मलिकबाबा यांच्या दर्शनासाठी मोटरसायकलने जात होते. त्यावेळी दर्शनाची ओढ लागलेल्या कुटुंबावर नियतीचा फेरा आला..आणि सारं काही उध्वस्त झाले. 

बाबाने बुलाया है!..बाबांच्या दर्शनाची ओढ लागलेल्या कुटुंबावर नियतीचा फेरा..बापलेकीच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच

sakal_logo
By
अरूण भामरे

नाशिक / अंतापूर : चलो बाबाने बुलाया है.. असं म्हणत सकाळी सातच्या सुमारास पती- पत्नी व मुलगी हे अंतापूर येथील हिंदू- मुस्लिम समाजाचे दैवत दावल मलिकबाबा यांच्या दर्शनासाठी मोटरसायकलने जात होते. त्यावेळी दर्शनाची ओढ लागलेल्या कुटुंबावर नियतीचा फेरा आला..आणि सारं काही उध्वस्त झाले. 

दर्शनाची इच्छा अपूर्णच

सकाळी सातच्या सुमारास राहुल महाजन, त्यांची पत्नी नीलम व मुलगी आर्या अंतापूर येथील हिंदू- मुस्लिम समाजाचे दैवत दावल मलिकबाबा यांच्या दर्शनासाठी मोटरसायकलने जात होते. गॅस गुदामाजवळ खराब रस्ता असल्याने खड्डे चुकवताना समोरून आलियाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (एमएच ४१ ए.००८१) सटाणा येथे रुग्ण महिला घेऊन जात असताना दुचाकी व तिची समोरासमोर धडक झाली. यावेळेस राहुल व आर्या यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर पत्नी नीलम बाजूला फेकल्या गेल्या. ताहाराबाद येथील सुनील नंदन यांनी जायखेडा पोलिस ठाण्याला दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. हवालदार गोपीनाथ भोये, शिपाई राजू गायकवाड यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

मोसम नदी किनाऱ्यावर दोघांवर अंत्यसंस्कार

नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मोसम नदी किनाऱ्यावर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप महाजन यांनी अग्निडाग दिला. पत्नी नीलम यांच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ताहाराबाद येथे बंद पाळण्यात आला. अंत्यसंस्कारप्रसंगी द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत, डॉ. प्रशांत सोनवणे, भाजप नेते सीताराम साळवे, सोसायटी सभापती के. पी. जाधव, उपसरपंच डॉ. डी. एस. महाजन, डॉ. नितीन पवार, मुकेश साळवे, सुभाष नंदन, विजय पगार, भूषण नांद्रे, निकम, शशी निकम, विनोद जिरे, सुनील नंदन, गावातील विविध संस्था, मंडळ पदाधिकारी, संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?

जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा

दुचाकीने देवदर्शनाला जाणाऱ्या महाजन कुटुंबाला रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत बापलेक ठार, तर पत्नी गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (ता. ३०) सकाळी घडली. मृतात ताहाराबाद (ता. बागलाण) येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादास महाजन (वय ३४) त्यांची कन्या आर्या महाजन (वय ६) यांचा समावेश असून, त्यांच्या पत्नी नीलम (वय ३२) गंभीर जखमी आहेत. रुग्णवाहिका चालकाविरुद्ध जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. 

रिपोर्ट - अरूण भामरे

संपादन - ज्योती देवरे