वडिलांचे पितर आटोपून लेकाने केले कर्तव्य पूर्ण; त्याच्यावरच नियती 'अशी' झाली क्रूर!

अंबादास शिंदे
Monday, 14 September 2020

सध्या पितृपंधरवडा सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी आपल्या मृत नातेवाईकांचे पितर घालण्यात येत आहेत.  देवळाली कॅन्टोन्मेंट हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश रिक्कल यांनी वडिलांचे पितर घातले. त्यानंतर ते दुचाकीवरूनदेवळाली कॅम्पकडे जात होते. तिथेच त्यांच्यावर काळाचा घाला आला. आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

नाशिक रोड : सध्या पितृपंधरवडा सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी आपल्या मृत नातेवाईकांचे पितर घालण्यात येत आहेत.  देवळाली कॅन्टोन्मेंट हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश रिक्कल यांनी वडिलांचे पितर घातले. त्यानंतर ते दुचाकीवरूनदेवळाली कॅम्पकडे जात होते. तिथेच त्यांच्यावर काळाचा घाला आला. आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

वडिलांचे पितर आटोपून येताना काळाचा घाला

देवळाली कॅन्टोन्मेंट हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश रिक्कल वडिलांचे पितर आटोपून दुचाकीवरून (एमएच १५, जीजी १८३६) देवळाली कॅम्पकडे जात असताना विहितगावजवळ मागून आलेल्या दुचाकीने (एमएच १५ जीएस ८६०४) रमेश रिक्कल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रिक्कल खाली पडून गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अभिषेक नगरकर (रा. देवळाली रेस्ट कॅम्प रोड, बनात चाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. ही घटना शुक्रवारी (ता.११) दुपारी तीनच्या सुमारास विहितगाव येथील लोट्स हॉटेलसमोर घडली.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

अचानक ब्रेक मारताच तरुण ठार 

 भरधाव दुचाकी पिक-अपला मागून धडकल्याने तरुण ठार झाला. ही घटना लॅम रोड, रेणुका गार्डन इमारतीसमोर घडली. सनी ठोकळ (वय २८, रा. देवळाली कॅम्प, हाडोळा) सोमवारी (ता. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, जीएन ५१८३) देवळाली कॅम्पहून विहितगावकडे भरधाव जात असताना रेणुका गार्डन इमारतीसमोर त्याच्यापुढे असलेल्या पिक-अपचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे सनी पिक-अपवर आदळला. त्याच्या तोंडाला, डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bike accident Teacher killed in Vihitgaon nashik marathi news