esakal | संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

woman molested in hospital.jpg

राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित महिला रुग्णांसोबत घडलेल्या लाजिरवाण्या घटनांमुळे महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असताना शहरातील मनपाच्या रुग्णालयातदेखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या भीषण संकटातून देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे

संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना सारख्या भीषण संकटातून देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित महिला रुग्णांसोबत घडलेल्या लाजिरवाण्या घटनांमुळे महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अशातच मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.

स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य ​

 डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास बाबूराव शिंदे असे संशयित कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला

झाकीर हुसेन रुग्णालयात मंगळवारी (दि.६) दुपारच्या सुमारास कोरोनाबाधित महिला रुग्ण नैसर्गिकविधीकरिता स्वच्छतागृहात गेली असता संशयित संशयित मनपा कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (५६,रा.जुने नाशिक) याने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर बाहेरून लाथ मारून महिला रुग्ण आतमध्ये असतानासुध्दा लघवी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या महिलेने आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यानंतर शिंदे याने घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांनी मनपाचे डॉक्टर बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शिंदे याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला. दरम्यान, घटनेनंतर संशयित शिंदे हा फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजनकुमार सोनवणे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरिक्षक इंगोले हे करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

गुन्हा रात्री उशिरा दाखल

हा संपूर्ण प्रकार पीडित महिलेने डॉक्टरांना सांगितल्यानंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

go to top