esakal | ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी
sakal

बोलून बातमी शोधा

revati bacchav.jpg

बच्छाव कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून, घरात एकच मोबाईल व शिकणारी भावंडे तीन आहेत. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाइन अभ्यासाला बसण्यासाठी मोबाईल मिळत नव्हता..

ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मुंजवाड : बच्छाव कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून, घरात एकच मोबाईल व शिकणारी भावंडे तीन आहेत. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाइन अभ्यासाला बसण्यासाठी मोबाईल मिळत नव्हता..

मोबाईल मिळत नसल्याने अभ्यास अपूर्ण राहिल

रेवती संजय बच्छाव असे तिचे नाव असून, ती सटाणा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. बच्छाव कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून, घरात एकच मोबाईल व शिकणारी भावंडे तीन आहेत. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाइन अभ्यासाला बसण्यासाठी मोबाईल मिळत नसल्याने आपला अभ्यास अपूर्ण राहील, या भीतीपोटी तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

शासनाने तातडीने शाळा सुरू कराव्यात

रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नाहीत. त्यामुळे रेवतीच्या आत्महत्येने येथे हळहळ व्यक्त होत आहे. सटाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शासन आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते दिनेश बच्छाव यांनी केला असून, शासनाने तातडीने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणात येत असलेल्या अडथळ्यांच्या संभाव्य परिणामांना घाबरून येथील एका बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. ८) आत्महत्या केली..

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

संपादन - ज्योती देवरे

go to top