नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळी ‘पाहुण्यां‘चे आगमन; पर्यटकांसाठी सोबत शुभ संकेतही!

birds are arriving at nandurmadhmeshwar bird sanctuary nashik marathi news
birds are arriving at nandurmadhmeshwar bird sanctuary nashik marathi news

नाशिक :  गोदावरी-कडवा नदीच्या संगमावरील धरणाच्या विशाल जलाशयात अर्थात, नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात हिवाळी ‘पाहुण्यां‘चे आगमन सुरु झालयं. खाटीक, वेडाराघू, मुनिया, वारकरी, जाकाना, ग्रे हेरॉन, कापशी घार, मार्श हेरीअर, पेंटेड स्टोर्क, गडवाल, हळदी-कुंकू, थापट्या, धनेश, किंगफिशर आदी पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. 

पर्यटनासाठी ऑन लाईन बुकिंगचा प्रस्ताव

नांदूरमधमेश्‍वर बंधारा १९०७-१९१३ मध्ये बांधला गेला होता. गाळ साचून आणि वनस्पतींची वाढ होऊन इथे पक्षांसाठी उत्कृष्ट असा अधिवास निर्माण झाला. अर्थात, अशी पाणथळ जागा हजारो पक्षांना आकर्षित करते. अभयारण्यात २६५ पक्षी प्रजातींची नोंद केली गेली आहे. कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. पुढील महिन्यात पर्यटकांसाठी राज्यातील अनेक अभयारण्य खुली केली जाण्याचे संकेत मिळत असून त्यात नांदूरमधमेश्‍वरचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर इथे हिवाळ्यात पक्षी स्थलांतर करुन मुक्कामी येतात. त्यांना पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. आताच्या कोरोना महामारीमुळे अभयारण्यामध्ये पर्यटन कसे सुरु करता येईल याचा विचार केला जात असून राज्यातील अभयारण्यातील पर्यटनासाठी ऑन लाईन बुकिंगचा प्रस्ताव पुढे आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

पक्षी गणना पुढील आठवड्यात

नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, कळसुबाई शिखर, हरिचंद्र गड, दुगारवाडी धबधबा अशी अनेक पर्यटनस्थळे असून या सर्व ठिकाणी ऑन लाईन बुकिंग करून पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. अभयारण्य बंद असल्याने गाईड, वन मजूर आदींच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ग्राम परिस्थितीकीय समितीच्या खात्यात पैसे नसल्याने अनेकावर बेरोजगारी कुऱ्हाड कोसळली आहे. त्यावर उपाय म्हणून अभयारण्य सुरु करण्यासाठी विचार केला जात असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. हिवाळ्यामध्ये दरवर्षी वन विभागातर्फे दर महिन्याला पक्षी गणना केली जाते. यंदा पहिली पक्षी गणना पुढील आठवड्यात केली जाणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून वन कर्मचारी, गाईड आणि काही पक्षी अभ्यासक त्यामध्ये सहभागी होणार आहेत. 

लॉकडाऊनमध्ये आणि नंतर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. हिवाळी पक्षांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे. पुढील आठवड्यात वरिष्ठांच्या परवानगीने पहिली पक्षी गणना केली जाणार आहे. निवडक पक्षी अभ्यासकांनाही पक्षी गणनेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. 
- अशोक काळे (प्रभारी, वन परिक्षेत्र अधिकारी) 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com