भाजप शहर कार्यकारिणीचा वाद चंद्रकांत दादांच्या दरबारात...भाजपच्या कार्यकर्त्यांचे लागले लक्ष

विक्रांत मते
Tuesday, 4 August 2020

एकीकडे भाजपने शहरभर आरोग्य शिबिरे भरवून कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न चालविले असताना दुसरीकडे पक्षांतर्गत राजकारणाने उचल खाल्ली आहे. शहराची नवीन कार्यकारीणी घोषित करताना नव्या दमाच्या कार्यकर्ते, नगरसेवकांना दिलेली संधी पक्षाच्या एका उच्च पदस्थ पदाधिकायाच्या पचनी न पडल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दरबारात वाद पोहोचला आहे. 

नाशिक : एकीकडे भाजपने शहरभर आरोग्य शिबिरे भरवून कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न चालविले असताना दुसरीकडे पक्षांतर्गत राजकारणाने उचल खाल्ली आहे. शहराची नवीन कार्यकारीणी घोषित करताना नव्या दमाच्या कार्यकर्ते, नगरसेवकांना दिलेली संधी पक्षाच्या एका उच्च पदस्थ पदाधिकाऱ्याच्या पचनी न पडल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दरबारात वाद पोहोचला आहे. वाद मिटून येत्या महिनाभरात नवीन कार्यकारीणी घोषित करण्याचे प्रयत्न शहराध्यक्ष गिरीष पालवे यांचे असले तरी त्यात कितपत यश मिळते याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी 
विधानसभा निवडणुकीपुर्वी प्रभारी कार्यभार असलेल्या बाळासाहेब सानप यांना हटवून त्या जागी नवीन नेतृत्व देण्यासाठी भाजप मध्ये मोठी स्पर्धा लागली होती. शहराध्यक्ष पदी गिरीष पालवे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शहर कार्यकारीणी घोषित होणे अपेक्षित असताना अद्यापही नवीन कार्यकारीणी जाहिर झाली नाही. यादी तयार असली तरी प्रदेशाध्यक्षांकडून अद्यापही घोषित करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला नाही. कार्यकारीणी मध्ये एका महिला नगरसेविकेसह माजी स्थायी समिती सभापती व प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्याच्या नातेवाईकाचा समावेश आहे. परंतू हे तिनही नावे भविष्यात अडचणीची ठरतील म्हणून एका मोठ्या पदाधिकायाने त्याला विरोध करताना थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे नकार कळविला आहे. आता प्रदेश कार्यकारीणी मध्येंच समावेश असल्याने प्रदेशाकडून थेट नकार दिला जात नसल्याने तुर्त नव्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन नियुक्त्या जाहीर करून कोंडी फोडण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

महिला शहराध्यक्ष पदावरून वाद 
भाजपच्या महिला शहराध्यक्ष पदावर एका नगरसेविकेला संधी मिळणार आहे. परंतू पक्षात मोठ्या पदावर काम करून ताकद वाढल्यास विधानसभा निवडणुकीसाठी दावेदारी ठरू शकते. या भितीने नवीन कार्यकारीणीला विरोध होत असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

रिपोर्ट - विक्रांत मते 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP city executive's dispute nashik marathi news