सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

सुदाम गाडेकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

वनहद्दीनजीकच्या ओसाड परिसरातील एका खड्ड्यातून दुर्गंधी येत असल्याने  संशय बळावल्याची चर्चा गावभर झाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.गावात एकच खळबळ माजली अन् पुढे झालाच अखेर त्या गोष्टीचा खुलासा

नाशिक / नगरसुल : वनहद्दीनजीकच्या ओसाड परिसरातील एका खड्ड्यातून दुर्गंधी येत असल्याने  संशय बळावल्याची चर्चा गावभर झाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.गावात एकच खळबळ माजली अन् पुढे झालाच अखेर त्या गोष्टीचा खुलासा

त्या घटनेची गावभर चर्चा...अखेर झालाच खुलासा

रेंडाळे (ता. येवला) येथील शेतकरी राजाराम आहेर शेतात मोटर सुरू करण्यासाठी जात असताना वनहद्दीलगत उग्र वास येत असल्याने त्यांनी जवळ जात नेमके काय आहे हे तपासले असता खड्ड्यात काहीतरी पुरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांचा संशय बळावला. ही गोष्ट गावात सर्वत्र पसरली आणि घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संशयास्पद जागेवर दगडगोटे भरलेल्या खड्ड्यात ग्रामस्थांच्या मदतीने खोदकाम केले असता तेथे मृत वासरू कापड, प्लॅस्टिकच्या गोण्या व गोधडीत गुंडाळून पुरलेले आढळले. त्यानंतर ग्रामस्थांनी डोक्याला हात लावत सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र दिवसभर एकच संशय निर्माण झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. 

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

बापरे...हे काय निघाले?

रेंडाळे (ता. येवला) येथील वनहद्दीनजीकच्या ओसाड परिसरात घातपात करून एका व्यक्तीचा मृतदेह जमिनीत खड्ड्यात पुरल्याचा संशय बळावल्यामुळे गावात एकच खळबळ माजली. तसेच संशयित ठिकाणी सहा बाय तीन फुटांचा खड्डा खोदून मृतदेह पुरल्याचा प्रकार प्रत्यक्षदर्शींना दिसला. शिवाय त्या ठिकाणाहून दुर्गंधी येत असल्याने घातपात करून मानवी मृतदेह पुरल्याचा संशय बळावल्याची चर्चा गावभर झाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत संशयित जागी खोदले असता गायीचे मृत वासरू पुरलेले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे विषयाला पूर्णविराम मिळाला. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

रिपोर्ट - सुदाम गाडेकर

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspicious of murder at yeola nashik marathi news