अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

woman crying 1.jpg
woman crying 1.jpg

नाशिक : कोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. वाचा एक थरारक घटना...

असा घडला प्रकार

महिन्याभरापूर्वी दीपक पवार हा पत्नी पूजा हिच्या समवेत तुळजाभवानी नगर येथील ओम साई निवास येथे राहण्यासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्ताऱ्याने वार केले. त्यानंतर पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पलायन केले. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पूजा हिने घराचा दरवाजा वाजवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती.

फरार पतीचा शोध

पुजाला जखमी अवस्थेत तत्काळ जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. गळ्यावर जबरदस्त घाव बसल्याने गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान घटनेचे वृत्त समजताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सुरेश नरवाडे संदीप शेळके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहे..

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ​

पेठरोडवरील तुळजाभवानी नगर समर्थनगर येथे पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत पूजा दीपक पवार (23) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पत्नीवर वस्तऱ्याने वार केल्यानंतर संशयित आरोपी पती दीपक पवार याने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com