नगरपंचायतीचे रणशिंग! भाजप पदाधिकाऱ्यांची गटनेत्यासह पेठला शिवसेनेत घरवापसी; भाजपला जोरदार धक्का

रखमाजी सुपारे
Tuesday, 13 October 2020

आगामी नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात शिवसेनेने नगरपंचायत निवडणुका जोरदार तयारीने लढविण्याचा निर्णय घेतला, तसेच नाराज होऊन इतर पक्षात गेलेल्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्याच्या मोचेबांधणीला सुरवात झाली. 

नाशिक / पेठ : पेठ नगरपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने आज भाजपला जोरदार धक्का दिला. नगरपंचायतीचे गटनेते भागवत पाटील व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पद्‍माकर कामडी यांनी भाजपला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत घरवापसी केली. 

गटनेत्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची पेठला शिवसेनेत घरवापसी 
आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेठ शहरातील लोकप्रतिनिधी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. शिवसेनेचे दिंडोरी विधानसभा संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या आढावा बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात शिवसेनेने नगरपंचायत निवडणुका जोरदार तयारीने लढविण्याचा निर्णय घेतला, तसेच नाराज होऊन इतर पक्षात गेलेल्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्याच्या मोचेबांधणीला सुरवात झाली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

नगरपंचायतीचे रणशिंग 
उपमहानगरप्रमुख देवा जाधव, तालुकाप्रमुख भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, बाजार समिती संचालक श्यामराव गावित, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, गटनेते भागवत पाटील, पद्माकर कामडी, शहराध्यक्ष गणेश शिरसाठ, महिला आघाडीप्रमुख शीतल रहाणे, संतोष डोमे, नंदू गवळी यांच्यासह नगरसेवक व पेठ शहरातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP group leader return to ShivSena nashik marathi news