esakal | आमदार फुटू नये म्हणून 'भाजप'कडून लॉलीपॉप...मिश्किल शैलीत भुजबळांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal1.jpg

अस्वस्थ आमदार सांभाळायचे म्हणजे पक्ष जिवंत असून त्यात धुगधुगी आहे, हे दाखविण्यासाठी अधून-मधून असे लॉलीपॉप दाखवावेच लागते. असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. नाशिकला कोरोना आढावा बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

आमदार फुटू नये म्हणून 'भाजप'कडून लॉलीपॉप...मिश्किल शैलीत भुजबळांची टीका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यात सत्ता बदलाची चर्चा म्हणजे भाजपकडून त्यांच्या पक्षातील अस्वस्थ आमदारांना सांभाळण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून दाखविले जाणारे लॉलीपॉप आहे. अस्वस्थ आमदार सांभाळायचे म्हणजे पक्ष जिवंत असून त्यात धुगधुगी आहे, हे दाखविण्यासाठी अधून-मधून असे लॉलीपॉप दाखवावेच लागते. असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. नाशिकला शुक्रवारी (ता.17) कोरोना आढावा बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. 

जिंदा हूं दाखवावेच लागते...
 
राजस्थानमधील प्रकरण ताजे असतांना, सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाबाबत श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात पाच वर्षे महाविकास आघाडीचीच सत्ता राहिल. आमदार फूटू नये म्हणून, भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या आमदारांना सत्ता रूपी लॉलीपॉप दाखविले जात असल्याची मिश्‍कील टिका केली. श्री भुजबळ म्हणाले राज्यात महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या पध्दतीने कामकाज करीत आहे. ते स्थिर व मजबूत आहे. त्यामुळे भाजपकडून घडविली जात असलेली सत्ता बदलाची चर्चा पूर्ण निरर्थक आहे. पक्ष मृत झालेला नाही. पक्षात काही तरी चालू आहे. धुगधुगी सुरु आहे. हे दाखविण्यासाठी 'जिंदा हूं' हा संदेश देण्यासाठी असे करावे लागते. 

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

पोलिस आयुक्तांची बदली 'शक्य' 

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या बदलीच्या अनुषंगाने त्यांना विचारले असता, शक्य आहे. एवढेच त्रोटक उत्तर देउन ते म्हणाले की राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरसकट बदल्या न करता १५ टक्के बदल्या करण्याचे राज्य मंत्रीमंडळाने ठरविले आहे. त्यामुळे मुदत संपली पदोन्नत्यासह प्रशासकीय गरजेच्या कारणाने १५ टक्के आधिकाऱ्यांच्या मात्र बदल्या होणार आहे. त्यामुळे त्यांची बदली शक्य आहे. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?