नव्या आमदारांना मार्चपूर्वीच 50 लाखांची लॉटरी! 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 23 January 2020

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात प्रत्येक आर्थिक वर्षासाठी प्रत्येक आमदाराला दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी या आर्थिक वर्षाचा दोन कोटींचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली होती. मतदारराजा पावण्यासाठी अनेक आमदारांनी हा निधी तेव्हाच खर्चून मतदारसंघात कामे मार्गी लावली आहेत. नवीन आमदारांना मार्च संपण्याची प्रतीक्षा करावी लागली असती. याच हेतूने या आर्थिक वर्षात मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा आमदारांना होती. 

नाशिक : आर्थिक वर्षासाठी असलेला आमदारांचा स्थानिक विकास निधी यापूर्वीच खर्च झाल्याने नवनिर्वाचित आमदारांना आताच्या निधीसाठी मार्च संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार होती. मात्र, विकास महाआघाडीने आमदारांच्या या प्रतीक्षेला ब्रेक लावत प्रत्येक आमदाराला 50 लाखांचा निधी दिला आहे. या मुळे जिल्ह्यालाही तब्बल साडेसात कोटी निधीची लॉटरी लागली आहे. 

जिल्ह्याला अतिरिक्त साडेसात कोटी;

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात प्रत्येक आर्थिक वर्षासाठी प्रत्येक आमदाराला दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी या आर्थिक वर्षाचा दोन कोटींचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली होती. मतदारराजा पावण्यासाठी अनेक आमदारांनी हा निधी तेव्हाच खर्चून मतदारसंघात कामे मार्गी लावली आहेत. नवीन आमदारांना मार्च संपण्याची प्रतीक्षा करावी लागली असती. याच हेतूने या आर्थिक वर्षात मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा आमदारांना होती. 

हेही वाचा >  राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही - आठवले

एप्रिलनंतर पुन्हा दोन कोटी 

त्यामुळे 288 आमदारांना प्रत्येकी 50 लाख याप्रमाणे सुमारे 144 कोटी रुपयांचा आमदार निधी ठाकरे सरकारने दिला आहे. हा निधी मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करायचा आहे. त्या मुळे मतदारसंघात विकासकामे करणे सोपे जाणार आहे. विशेषतः मार्चनंतर नव्या आर्थिक वर्षाचा निधी मिळणार असून, तोपर्यंत हा वाढीव निधी आमदारांसाठी लॉटरी समजला जात आहे. जिल्ह्यातील छगन भुजबळ, दादा भुसे, नितीन पवार, दिलीप बोरसे, नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, सुहास कांदे, मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, राहुल आहेर, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि सरोज अहिरे या आमदारांना हा निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, 1 एप्रिलनंतर पुन्हा नव्या आर्थिक वर्षात अधिकचा दोन कोटींचा निधी आमदारांच्या पदरात पडणार असून, हा अतिरिक्त निधी मतदारसंघाला पावला, असेच म्हणावे लागेल.  

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bonus of fifty lakhs for new MLAs before March Nashik Marathi News