
गेल्या दोन वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी व नंतर कोरोनामुळे संकटात असतानाही कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बोनसबाबत निर्णय घेतला आहे.
सातपूर (नाशिक) : महिंद्र ॲन्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनतर्फे कंपनी व्यवस्थापनाशी चर्चेनंतर यंदा ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बोनस देण्याचा निर्णय झाल्याचा दावा युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी केला आहे.
महिंद्रतर्फे भरघोस बोनस
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतील बोनसच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी व नंतर कोरोनामुळे संकटात असतानाही कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बोनसबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार किमान ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बोनस देण्यात येणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. बोनसबरोबरच पगाराची रक्कम एकत्र केल्यास ही रक्कम एक लाख ते पावणेदोन लाखांच्या घरात जाणार आहे. तसेच, अनेक कामगारांची मुलेही याच कंपनीत असल्याने त्यांचा एकत्रीत विचार केल्यास ही रक्कम आणखीच वाढणार आहे.
हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..
एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांचा दावा
यापूर्वी सीटूसह इतर अंतर्गत युनियन असलेल्या अनेक कंपन्यांनी करारात ठरल्याप्रमाणे बोनस जाहीर केले आहेत. त्यामुळे नाशिकच्या बाजारांत खरेदीला चागंलाच वेग येणार असून, व्यापारी-व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे, सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी, एस. टी. शिर्के यांच्यातर्फेही विशेष प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...