esakal | जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..! कृत्याचं होतयं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

collector mandhre.jpg

शासकिय काम आणि सहा महिने थांब! ही म्हण सर्वज्ञात आहेच. स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष झाले पण ही म्हण अपवादानेच खोटी ठरली आहे. अपवादानेच काही शासकीय  कर्मचारी, अधिका-यांनी तसा प्रयास केला. कदाचीत यालाच कासवगती असेही  म्हटले गेले असावे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या एका कृतीने या सर्वांवर व्हाईट वॅाश मारला आहे. काय घडले नेमके वाचा...

जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..! कृत्याचं होतयं कौतुक

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : शासकिय काम आणि सहा महिने थांब! ही म्हण सर्वज्ञात आहेच. स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष झाले पण ही म्हण अपवादानेच खोटी ठरली आहे. अपवादानेच काही शासकीय  कर्मचारी, अधिका-यांनी तसा प्रयास केला. कदाचीत यालाच कासवगती असेही  म्हटले गेले असावे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या एका कृतीने या सर्वांवर व्हाईट वॅाश मारला आहे. काय घडले नेमके वाचा...

जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला नुकताच एक प्रसंग

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच एक प्रसंग घडला. जिल्हाधिकारी म्हणजे शिष्टाचार, अधिकार आणि शासकीय प्रतिष्ठेचे प्रतिक! या पदावरील अनेक अधिकारी त्याचा बडेजाव मिरवतात. मात्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे दोन दिवसांपूर्वी हा सर्व बडेजाव बाजूला समाजाला जणू एक उदाहरणच दाखवून दिले आहे,  येथील कयुम आणि एरीका कोठावाला हे ज्येष्ठ पारशी दाम्पत्य त्यांच्या एका कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. या  कार्यालयात लिफ्ट नाही. मात्र वयोमानामुळे त्यांना पाय-या चढण्यात अडचण येत होते. प्रयत्न करुनही ते शक्य नसल्याने ते जिल्हाधिकारी इमारतीबाहेरच थांबले. हे जिल्हाधिकारी मांढरे यांना ते कळल्यावर ते स्वतःच कार्यालयाबाहेर गेले. त्यांनी दाम्पत्याला बसायला खुर्च्या दिल्या. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न समजुन घेऊन त्याचे तीथेच निराकरण करुन संबंधीतांना सुचना दिल्या. मांढरे यांची सह्रदयता पाहून हे जोडपे खुपच प्रभावीत झाले. त्यांनी मांढरे यांना आमच्या घरी भेट द्या अशी विनंतीही केली. मांढरे यांनी ती प्रेमाने मान्य केली.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

जिल्हाधिकारी मांढरे यांच्यातील एक संवेदनशील अधिकारी

काम करताना अशी संवेदनशिलता, सकारात्मक दृष्टीकोण ठेवला तर कोणत्याही नागरिकाला अशी कार्यालये परग्रहावरची वाटणार नाहीत हे नक्कीच. शासन, प्रशासन आणि ही सरकारी कार्यालये सगळ्यांना आपलीच वाटतील. फक्त तीथे मांढरे यांच्यासारखे काही अधिकारी हवेत. चक्क कार्यालय सोडून कामासाठी आलेल्या एका दाम्पत्याला भेटण्यास रस्त्यावर गेले. रस्त्यावरच त्यांची अडचण समजून घेत त्यांचा प्रश्न सोडवला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यातील एका संवेदनशील अधिकारी दिसून आला. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

go to top