रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

विनोद बेदरकर
शुक्रवार, 31 जुलै 2020

महामार्गावरील पुलाच्या कामासाठी कॉलमचा खड्डा खोदण्यात आला आहे. खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोघेही मोटारसायकलसह कॉलमच्या खड्डात पडले. रात्रीची वेळ असल्याने परिसरात शांतता..दुसरीकडे खड्ड्यात दोघांची मरणाशी झुंज...थरारक घटना...

नाशिक : महामार्गावरील पुलाच्या कामासाठी कॉलमचा खड्डा खोदण्यात आला आहे. खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोघेही मोटारसायकलसह कॉलमच्या खड्डात पडले. रात्रीची वेळ असल्याने परिसरात शांतता..दुसरीकडे खड्ड्यात दोघांची मरणाशी झुंज...थरारक घटना...

असा घडला प्रकार

शेतीसाठी औषधे घेण्यासाठी शेतकरी हिरालाल पुनजाराम आहिरे (५४) व बालु भिला जगताप (३८) हे दोघे मोटारसायकल (एमएच ४१, झेड ४६३९) वरुन चाळीसगावकडे येते असताना, तालुक्यातील दरेगाव-लोंढे येथे महामार्गाच्या (बहाळ मार्ग) कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोघेही मोटारसायंकलसह कॉलमच्या खड्डात पडले. चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव-लोंढे महामार्गाचे काम सुरु आहे, महामार्गावरील पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या कॉलमच्या खड्ड्याचा रात्रीच्या सुमारास अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही खड्ड्यात मरणाशी झुंज देत होते.

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?

रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने दोघांचा मृत्यू

ही घटना (ता.३०) रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. दोघे हे लेडाणे, ता.मालेगाव,जि.नाशिक येथील आहे. हिरालाल पुनजाराम आहिर व बालु भिला जगताप अशी मयताची नावे आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात नोंद करण्यात आली आहे. दोघांनाही जबर मार लागल्यामुळे व रात्रीच्या सुमारास कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

सकाळी ग्रामस्थाना दोघेही मयत अवस्थेत खड्ड्यात पडल्याचे दिसल्यानतंर त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस पाटील सागर पाटील यांना दिली. सागर पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानतंर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पंचनामा करुन दोघांचे ही मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला पोस्टमार्टमसाठी रवाना केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: both died after falling in big pit nashik marathi news