
सोशल मीडियाचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास त्याचा किती चांगला परिणाम होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरवलेला मुलगा सापडल्यानंतर बघायला मिळाले. आई-वडिलांपासून दुरावलेला मुलगा पालकांच्या मिठीत विसावला. त्यावेळी आई- वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काय घडले नेमके?
सिडको (नाशिक) : सोशल मीडियाचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास त्याचा किती चांगला परिणाम होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरवलेला मुलगा सापडल्यानंतर बघायला मिळाले. आई-वडिलांपासून दुरावलेला मुलगा पालकांच्या मिठीत विसावला. त्यावेळी आई- वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काय घडले नेमके?
आई-वडिलांपासून दुरावलेला मुलगा पालकांच्या मिठीत विसावला
ऋषी नीलेश सानप (वय १४) गुरुवारी अचानक गायब झाला. त्याच्या शोधासाठी त्याच्या पालकांनी जंगजंग पछाडले. पण काही करता मुलगा सापडेना. ही बाब सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी जगदाळे यांना कळाली. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मुलाचे छायाचित्र टाकून मुलगा सापडल्यास कळवावे, असे आवाहन केले. त्यानुसार ग्रुपवरील सदस्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. त्यांपैकी दोन जणांना हा मुलगा सापडला. त्यांनी पोलिस ठाण्यात त्याला स्वाधीन केले, तर मुलगा सापडल्याचे पुन्हा सोशल मीडियावर टाकले. यावरून ग्रुपमधील काही सदस्यांनी त्यांच्या पालकांच्या कानावर ही बाब टाकली. पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात येऊन मुलास ताब्यात घेतले.
हेही वाचा > ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO
हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना