अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

nashik crime news.
nashik crime news.

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे (वय १६) हिचा मृतदेह मंगळवारी (ता.१६) आहेरगाव येथील डाव्या कालव्यात आढळला. परंतु, गळा आवळल्याच्या खुना आढळल्याने मृत्यूचे गूढ कायम होते. पोलिस तपासानंतर मृत्यूचे गुढ उकलले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगावपासून जवळच असलेल्या कारसूळ येथील अल्पवयीन दीपिका अजय ताकाटे सोमवारी (ता.१५) पिंपळगाव महाविद्यालयात गेली. मात्र, सायंकाळ झाली तरी दीपिका घरी न आल्याने तिच्या परिवारात खळबळ उडाली होती. मंगळवारी (ता.१६) दीपिकाचा मृतदेह आहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात सापडल्यानंतर दीपिकाची आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होत नव्हते. त्यात गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याने पोलिस यंत्रणा अधिकच सतर्क झाली. पिंपळगाव पोलिस पथकाने तपास केल्यानंतर दीपिकाची आत्महत्या नाही तर मैत्रीच्या संबंधातून हत्या झाल्याचे समोर आले.

भाऊच ठरला वैरी

दीपिकाच्याच नात्यातला असलेला संशयित आरोपी विक्रम गोपीनाथ ताकाटे व त्याचा मित्र सोमनाथ दत्तात्रय निफाडे यांनी हत्या केल्याचे समोर आले. दीपिका व संशयित आरोपी विक्रम यांचे मैत्रीचे संबंध असल्याने ती विक्रमकडे विविध हट्ट करीत असायची. या हट्टाला कंटाळून विक्रमने दीपिकाला पिकअप वाहनातून सटाणा - ताराबाद रस्त्यात सोमवारी (ता.१५) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मित्राच्या सहाय्याने नेले. सुरवातीला दीपिकाचा ओढणी व दोरीने गळा आवळला. त्यानंतर आहेरगाव येथील पालखेड कालव्यात रात्री दीडच्या दरम्यान तिचा मृतदेह फेकून दिला. मंगळवारी सकाळी दीपिकाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. 

दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल

पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी केलेल्या तपासात विक्रम व सोमनाथ यांनीच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासकामात सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक पप्पू कादरी, पोलीस नाईक रवी बारहाते, पप्पू देवरे, नितीन जाधव, अमोल जाधव, मिथुन घोडके, उषा वाघ आदी सहभागी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com