esakal | दिवाळीची आवराआवर करून गाढ झोपलेल्या कुटुंबाला धक्का! तब्बल अडीच लाखांचा दणका!
sakal

बोलून बातमी शोधा

sinner theft.jpg

रात्री उशिरा ग्राहक निघून गेल्यावर त्यांनी बाजूच्या अंडाभुर्जीच्या दुकानात जेवण करून दिवाळीनिमित्त दुकान आवरायला काढले. हे काम आटोपल्यावर पहाटे पावणेचारच्या सुमारास दोघेही घराकडे परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना चांगलाच धक्का बसला. काय घडले नेमके वाचा...

दिवाळीची आवराआवर करून गाढ झोपलेल्या कुटुंबाला धक्का! तब्बल अडीच लाखांचा दणका!

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर ( जि.नाशिक) : रात्री उशिरा ग्राहक निघून गेल्यावर त्यांनी बाजूच्या अंडाभुर्जीच्या दुकानात जेवण करून दिवाळीनिमित्त दुकान आवरायला काढले. हे काम आटोपल्यावर पहाटे पावणेचारच्या सुमारास दोघेही घराकडे परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना चांगलाच धक्का बसला. काय घडले नेमके वाचा...

 गाढ झोप पडली महागात...

संकेत बाळासाहेब सोनवणे (३०) भावासमवेत नांदूरशिंगोटेत सलूनचा व्यवसाय करतात. गावातच दुमजली इमारतीत दोघे भाऊ वास्तव्याला आहेत. शुक्रवारी (ता.१३) दिवसभर दोघेही दुकानात काम करत होते. रात्री उशिरा ग्राहक निघून गेल्यावर त्यांनी बाजूच्या अंडाभुर्जीच्या दुकानात जेवण करून दिवाळीनिमित्त दुकान आवरायला काढले. हे काम आटोपल्यावर पहाटे पावणेचारच्या सुमारास दोघेही घराकडे परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात वीजपुरवठाही सुरू होता, तर शेजारीच राहणाऱ्या शंकर सोनवणे यांच्याही घराचा दरवाजा उघडा होता. हे पाहून ते पुढे गेले. मात्र, घराबाहेर ओट्यावर कपाटाचे ड्रॉवर पडलेले पाहून संकेत यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

झोपेतून उठल्यावर त्या मोठ्याने रडू लागल्या.

घरात डोकावून पाहिले असता त्यांना वहिनी सोनाली कॉटवर गाढ झोपेत असल्याचे दिसले. तर शेजारी असलेल्या कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडून आतील सामान, कपडे खोलीत अस्ताव्यस्त पडलेले होते. संकेत यांनी वहिनीला आवाज देऊन जागे केले. तसेच वरच्या मजल्यावर झोपलेल्या पत्नी व आई-वडिलांना आवाज दिला. घरात शिरून चोरट्यांनी चोरी केल्याचा थांगपत्ता सोनाली यांना नव्हता. झोपेतून उठल्यावर त्या मोठ्याने रडू लागल्या. याबाबत नांदूरशिंगोटे दूरक्षेत्रात सोनवणे यांनी माहिती दिली. हवालदार प्रवीण अडांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेत कपाटातील साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दहा हजार तीनशे रुपयांची रोकड, असा अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

दोन लाख ४८ हजारांचे घबाड चोरट्यांच्या हाती

दिवाळीची आवरासावर करून गाढ झोपी गेलेल्या कुटुंबाला घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांना दणका दिला. तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ही चोरीची घटना घडली. महिला झोपलेल्या खोलीतील कपाट उघडून दोन लाख ४८ हजारांचे घबाड चोरट्यांच्या हाती लागले.