आलं निसर्गाच्या मना तिथं कोणाचे चालेना! शेतकऱ्याच्या नशिबावर घाला; एक एकर ऊस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 15 October 2020

आलं निसर्गाच्या मना तिथं कोणाचे चालेना! या म्हणी प्रमाणे शेतकरी सध्या अनुभव घेत आहेत. दिवसरात्र काबाडकष्ट करत शेतात सोनं पिकवायचं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं व्हायचं असं समीकरणचं बहुधा शेतकऱ्यांच्या नशिबी असावं असं म्हणावं लागेल. अशीच काहीशी घटना बाभळेश्वर परिसर येथील शिवाजी शंकर टिळे या शेतकऱ्यासोबत घडली.

नाशिक : आलं निसर्गाच्या मना तिथं कोणाचे चालेना! या म्हणी प्रमाणे शेतकरी सध्या अनुभव घेत आहेत. दिवसरात्र काबाडकष्ट करत शेतात सोनं पिकवायचं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं व्हायचं असं समीकरणचं बहुधा शेतकऱ्यांच्या नशिबी असावं असं म्हणावं लागेल. अशीच काहीशी घटना बाभळेश्वर परिसर येथील शिवाजी शंकर टिळे या शेतकऱ्यासोबत घडली.

क्षणार्धात होत्याचं नव्हतं! शेतकऱ्याच्या नशिबावर घाला
मंगळवारी सायंकाळी पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी नाशिकरोड पासून जवळच असलेल्या मोहगाव-बाभळेश्वर रस्त्यालगतच्या शिवाजी शंकर टिळे यांच्या ऊसाच्या शेतात वीज पडली. विजेच्या प्रचंड आवाजानंतर लगेचच शेतातून धूर निघू लागला. हे पाहताच टिळेंनी शेताकडे धाव घेतली, वीज पडून एक एकरावरचा ऊस जळून खाक झाला. सोसाट्याचा वारा असल्याने काही मिनिटांत संपुर्ण शेत जळून खाक झालं. घटनेची माहिती गावात समजताच शेकडो ग्रामस्थांनी पेटलेला ऊस विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, वार्‍यामुळे ते अपयशी ठरले. दरम्यान, या नुकसानीचा पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burn an acre of sugarcane due to Thunderstorm nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: