
या शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायातील कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केल्यास स्वयंरोजगार करता येईल किंवा नोकरीही मिळू शकते, तसेच त्याच क्षेत्रासह इतर क्षेत्रातील उच्च शिक्षणही घेता येईल.
पंचवटी (नाशिक) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीत कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम संधी अद्याप उपलब्ध आहे. शहरातील स्वयंरोजगार देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी नऊशे जागा उपलब्ध आहेत.
व्यवसाय शिक्षणच्या ९०० जागा शिल्लक
दहावीनंतर लगेचच दोन वर्षे शिक्षण घेऊन अर्थार्जन करावयाचे असेल व भविष्यात चांगले करिअर करायचे असेल, तर अकरावी व बारावी या दोन वर्षांत व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे निश्चितच फायदेशीर ठरेल. या शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायातील कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केल्यास स्वयंरोजगार करता येईल किंवा नोकरीही मिळू शकते, तसेच त्याच क्षेत्रासह इतर क्षेत्रातील उच्च शिक्षणही घेता येईल. अशा प्रकारचे अभ्यासक्रम शहरातील के.टी.एच. म., एच.पी.टी., आर.वाय.के., बी.वाय.के., जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सातपूर), शासकीय तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालय, एस.एम.आर.के. महाविद्यालय, तसेच नाशिक रोड भागातील आरंभ महाविद्यालय, बिटको कॉलेज, के. जे. मेहता कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू आहेत.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
विविध अभ्यासक्रम
* अभियांत्रिकी : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
* वाणिज्य : लॉजिस्टिक ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, अकाउंटिंग फायनान्शिअल ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग फायनान्शिअल सर्व्हिसेस ॲन्ड इन्शुरन्स, मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट.
* पॅरामेडिकल : मेडिकल लॅब टेक्निशियन
* होम सायन्स : केटरिंग फूड प्रॉडक्शन, टुरिझम ॲन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला