फायनान्स कंपनीचा हप्ता वसुलीचा तगादा; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

सतीश निकुंभ
Saturday, 28 November 2020

लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले. लहान व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. आता हळूहळू कामकाज सुरळीत होत नाही तोच बँका व फायनान्स कंपन्यांच्या हप्ता वसुलीच्या तगाद्याने हैराण केले आहे. अशात काही फायनान्स कंपन्यांनी भाईगिरीतून वसुली सुरू केल्याने अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. 

सातपूर (नाशिक) : लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले. लहान व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. आता हळूहळू कामकाज सुरळीत होत नाही तोच बँका व फायनान्स कंपन्यांच्या हप्ता वसुलीच्या तगाद्याने हैराण केले आहे. अशात काही फायनान्स कंपन्यांनी भाईगिरीतून वसुली सुरू केल्याने अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. 

कंपनीच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या

अशाच भाईगिरीच्या प्रकारातून सातपूरला एका व्यावसायिकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. लॉकडाउननंतर सरकार घराचे व उद्योगधंद्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाने हैराण झालेल्या दुकानदाराने आत्महत्या केली. योगेश ऊर्फ राजू हनुमंत जाधव (वय ४२, सातपूर कॉलनी, श्रीकृष्णनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. जाधव यांचे आनंदछाया परिसरात मोबाईलचे दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. २७) पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृत जाधव यांना खासगी फायनान्स कंपनीचे लोक वारंवार दूरध्वनी करून वसुलीसाठी धमकी देत असत, अशी प्राथमिक माहिती नातेवाइकांनी दिली. त्यामुळे जाधव याने प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

वसुली न करता माणुसकीने व्यवहार करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही अनेक खासगी फायनान्स कंपन्या रिकव्हरी करताना दादागिरी करीत असल्याने अशा फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन केली.  

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman committed suicide due to pressure from the finance company Nashik marathi news